शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

६६ विनयभंग, २३ बलात्कार, १५ मुलींना पळविले

By admin | Updated: December 15, 2015 00:23 IST

घरातील पती, सासरे, दीर यांच्याकडून अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत आप्तेष्टांसोबतच प्रेमविरांनी घात केला आहे़ ...

११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव : महिलांसाठी असलेले कायदे थंडबस्त्यातधामणगाव रेल्वे : घरातील पती, सासरे, दीर यांच्याकडून अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत आप्तेष्टांसोबतच प्रेमविरांनी घात केला आहे़ चांदूररेल्वे उपविभागात या कालावधीत ६६ विनयभंग, २३ बलात्कार व १५ मुलींना पळविल्याच्या घटना घडल्या आहेत़ जवळच्या नातेवाईकांकडून महिलांचे शोषण होत असल्यामुळे न्याय कुणाकडे मागावा, असा सवाल या अत्याचारग्रस्त महिलांनी उपस्थित केला आहे़पुरूषांप्रमाणे महिलांना समान अधिकाराचे धोरण शासनाने आखले आहे़ मात्र याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहे़ परंतु जवळील नातेवाईकच महिलांचे शोषण करणार असेल तर न्यायासाठी कुणाच्या दारी जावे, असा प्रश्न निर्माण होत आहे़ चांदूररेल्वे उपविभागात सहा पोलीस ठाणे येतात. मागील ११ महिन्यांचा महिलांच्या अत्याचाराचा अहवाल घेतला असता आप्तेष्ट व प्रेमविरांकडून सर्वाधिक शोषण झाल्याची माहिती आहे़ धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दहा विनयभंगाचे प्रकरण घडले आहे़ ४ महिलांवर बलात्कार व दोंघींना पळवून नेले आहेत़दत्तापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात तब्बल नऊ विनयभंगाचे प्रकरण ११ महिन्यांच्या कालावधीत घडले आहेत़ एकींना पळवून नेले, दोन महिलेवर बलात्कार झाल्याची नोंद आहे़़ तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या परिसरात आठ विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे़ चार महिलांवर बलात्कार तर एकींना पळवून नेले आहे़ चांदूररेल्वेत महिलांवर अधिक अत्याचार चांदूररेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २१ प्रकरण विनयभंगाचे घडले आहे़ सहा जणांना पळवून नेण्यात आले आहे. पाच महिलांवर अतिप्रसंग झाला आहे़ प्रेम प्रकरणातून अन्याय करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे़ तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार अतीप्रसंग, तब्बल दहा विनयभंगाचे प्रकरण घडले आहे़ चार पळवून नेल्याची पोलीस ठाण्यात नोंद आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्या परिसरात एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केली, तर सावत्र बापानेच आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला चार बलात्कार, पाच पळवून नेणे तर आठ विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे़मागील अकरा महिन्यांत महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहे़ विनयभंग, अतिप्रसंग, मानसिक व शारीरिक छळ करणे हे प्रकार घडले आहे़ 'क्रिमिनल लॉ अमेडमेन्ट अ‍ॅक्ट'नुसार आता महिलांना पोलीस ठाण्यात न जाता कोठेही जबाब देता येतो़ परंतु जवळच्या नातेवाईकांचे वाढणारे दडपण अत्याचारित महिलांना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचू देत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ प्रेम प्रकरणाने तरूणीवर बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहे़ एकीकडे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के जागांचे आरक्षण ठेवले आहे़ दुसरीकडे आप्तस्वकीयांकडून होणाऱ्या अन्यायामुळे अत्याचारित महिलांना दाद मागणे अवघड होत आहेत़ (तालुका प्रतिनिधी)महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत पोलीस अनेक उपक्रम राबवीत आहेत़ मुलींची छेडछाड होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन नेहमी सतर्क राहते़ पोलीस ठाण्यात कौटुंबिक सल्लाकेंद्र सुरू करण्यात आले आहे़ महिलांना कौटुंबिक वादाबाबत मार्गदर्शन समुपदेशन करण्यासाठी महिला सहाय्यता केंद्र आहे़ त्यामुळे महिलांनी धाडसी बनवून तक्रार देण्यास पुढे येण्याची गरज आहे़- राजाराम सामी,पोलीस उपविभागीय अधिकारी, चांदूररेल्वे.