शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

५६ गावांना लागले आसेगाव तालुका निर्मितीचे वेध

By admin | Updated: March 8, 2015 00:16 IST

अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील ....

आसेगाव (पूर्णा) : अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील नागरिकांना आसेगाव तालुका निर्मितीची प्रतीक्षा लागली आहे.आसेगाव हे अमरावती ते परतवाडा आणि दर्यापूर ते चांदूरबाजार या चार शहरांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथे परिसरातील ३० ते ३५ गावांचा रोजचा संपर्क होतो. आसेगावच्या भोवताल अचलपूर, चांदूरबाजार, भातकुली व दर्यापूर या तालुक्यात अंतर्भूत असलेल्या गावांच्या सीमारेषा आहेत. हाकेच्या अंतरावरील पोहरा या गावासह पूर्णानगर वातोंडा, हिंमतपूर, अंचलवाडी, उमरटेक, वाकी, रायपूर, निरुळगंगामाई, मार्की, रामा आदी गावे भातकुली तालुक्यात समाविष्ट असून भातकुलीचे अंतर लांब असल्याने त्यांना गैरसोयीचे वाटते. तसेच येलकी, सावळापूर, वासनी (बु.), वासनी (खुर्द), हिवरापूर्णा, खैरी, दोनोडा, सावळी, येसूर्णा ही गावे अचलपूर तालुक्याला जोडली आहेत. तर आसेगावसह टाकरखेडा, तळणी, तामसवाडी, विरूळ, चिंचोली, दहिगाव, गोविंदपूर, जगन्नाथपूर, रसुलापूर, कृष्णापूर, धानोरा, राजना, कोटगावंडी आदी गावे चांदूरबाजार तालुक्यात समाविष्ट आहेत आणि आसेगाव ते दर्यापूर रोडवरील सांगवा, घडा या गावापासून पुढे दर्यापूर तालुक्याची हद्द सुरू होते. प्रस्तावित आसेगाव तालुक्यामध्ये ५६ गावे आणि १० उजाड अशा एकूण ६६ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे वृत्त पसरल्यापासून परिसरातील लोकांचे लक्ष आसेगावकडे लागले असून पुढच्या सोयीसाठी काहींनी येथे जागा वगैरे खरेदी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता फक्त आसेगाव तालुक्याच्या निर्मितीची घोषणा होण्याची प्रतिक्षा आहे. (वार्ताहर)