शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यातील तब्बल ५० हजार वाहनचालकांनी थकवली तीन कोटी रुपयांची दंड रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 11:04 IST

८८ टक्के दंड वसुली थकली : महिन्याकाठी वाढत चाललेय अनपेड ई-चलान

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ग्रामीण पोलिस दलातील जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिलदरम्यान तब्बल ६७ हजार ७३५ वाहनचालकांना ई-चलानने ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८०० रुपये दंड ठोठावला. त्यातील केवळ १२ टक्के अर्थात १७ हजार ९७३ वाहनचालकांनी ४२ लाख २२ हजार ९०० रुपये दंड भरला, तर तब्बल ४९ हजार ७६२ वाहनधारकांनी त्यांच्याकडे असलेला ३ कोटी १ लाख ४८ हजार ९०० रुपये दंड भरलाच नाही. ती रक्कम अनपेड राहिली. अर्थात, ती रक्कम त्या वाहनचालकांनी भरलीच नाही. दर महिन्यात, दरवर्षी त्या अनपेड चलनाच्या रकमेत कोट्यवधींची वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहतूकविषयीच्या उपाययोजना राबविण्यास मर्यादा येत आहेत.

दंड भरा; अन्यथा खटला दाखलअनपेड चलानधारकांनी त्यांच्या वाहनांवरील दंड वाहतूक शाखेसह जवळच्या पोलिस ठाण्यात भरावा. दंड थकीत राहिल्यास संबंधित वाहनधारकाचा परवाना निलंबित केला जाऊ जातो. प्रसंगी तो रद्ददेखील केला जातो तसेच दंडाकडे पाठ फिरविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटला भरला जातो. ते टाळण्यासाठी वाहनचालकांनी आपल्याकडे थकीत दंडाची रक्कम त्वरेने भरावी, असे आवाहन ग्रामीण वाहतूक शाखाप्रमुखसतीश पाटील यांनी केले आहे.

गतवर्षीचेही ८.८८ कोटी रुपये थकीतग्रामीण वाहतूक शाखेने वर्ष २०२३ या वर्षभरात एकूण २ लाख १२ हजार ४३८ वाहनचालकांना १०.६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. पैकी केवळ १ कोटी ७८ लाख ९१ हजार ६५० रुपये दंड वसूल केला, तर तब्बल ८.८८ कोटी रुपये दंड थकला आहे. यंदाच्या चार महिन्यांत अनपेड चलानमध्ये ३.४३ कोटींची भर पडली आहे.

ग्रामीण वाहतूक विभागाने यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत ६७,७३५ बेशिस्त वाहनधारकांना ३.४३ कोटी रुपयांचा दंड ई-चलानने आकारला. पैकी केवळ ४२.२२ लाख रुपये वाहनचालकांनी भरले. अनपेड चलानची रक्कम ३.०१ कोटींच्या घरात आहे. चलानधारकांनी तो थकीत दंड त्वरित भरावा.- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावती