शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

४५ दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:45 IST

स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाकी चालविणाºया ४५ वाहने पोलिसांनी डिटेन केले.

ठळक मुद्देरॅश ड्रायव्हिंग : रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात रस्त्यावर धूम स्टाईलने दुचाकी चालविणाºया ४५ वाहने पोलिसांनी डिटेन केले. त्यांच्यावर रॅश ड्राईव्हींग कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात जल्लोष करताना काही बेभान वाहन चालक रस्त्यावरून वेगाने वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. कर्कश हार्न वाजविणे, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, स्टंटबाजी करणे आदी प्रकारे काही वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत होते. सदर कारवाई सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली आहेत. वाहतूक शाखा, कोतवाली व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली असून तब्बल ४५ वाहनांना डिटेन करण्यात आले होते.कार चालकाने तिघांनाउडविण्याचा प्रयत्नबियाणी चौकात पोलिसांनी एका कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने कार वेगाने नेऊन पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग केला. दरम्यान कारने तिन गाड्यांना उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने अपघात घडला नाही. अखेर कार चालकाला गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आले.महिला बचावलीगाडगेनगर परिसरातील रोडवरून एक दुचाकीस्वार फुग्याला धागा बांधून हवेत उडवित भरधाव जात होता. दरम्यान मागील दुचाकीवर असणाºया एका महिलेच्या गळ्यात फुग्याचा धाग अडकला. हा प्रकार दिसताच काही नागरिकांनी आरडाओरड करून दुचाकीस्वारास थांबण्यास सांगितले. दुचाकी थांबल्यानंतर महिलेच्या गळ्यात अडकलेल्या धागा काढला. थोडाही विलंब झाला असता तर त्या महिलेचा गळा चिरला जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.