शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चिंताजनक! मेळघाटात 6 महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 21:18 IST

टायरअभावी आरोग्य विभागाची वाहने उभी; औषधांच्या तुटवड्यामुळे हाल

- नरेंद्र जावरे परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सहा महिन्यांत आठ मातांसह ३६४ बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत रविवारी तिसऱ्यांदा धारणी तालुक्यातील बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. टायरअभावी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका उभ्या असून, लहान बालकांसाठी आवश्यक औषधसाठा तेथे उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.मेळघाटात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ० ते ६ वयोगटातील २६४ बालके दगावली, तर शंभर उपजत बालकांचा मृत्यू, अशी एकूण १८० दिवसांत ३६४ बालके दगावली. ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद नुकतीच झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून, गेला आठवडाभर आरोग्य संचालक नागपूर व अकोला येथील आरोग्य उपसंचालक व इतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटचे दौरे केले. आरोग्य केंद्रांना भेटी दिल्यात. यामध्ये मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक वाहनांना टायर नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी मोहीम राबवणे गरजेचे असल्याचे मत स्वयंसेवी संस्थेचे बंड्या साने यांनी शासनाकडे मांडले असून, बालमृत्यूची आकडेवारीसुद्धा त्यांनी शुक्रवारी न्यायालयात सादर केली.बाल व स्त्रीरोगतज्ज्ञ दाखल, मात्र औषधांचा पत्ताच नाहीमेळघाटातील बालमृत्यूचे तांडव पाहता तीन स्त्रीरोगतज्ज्ञ व सात बालरोग तज्ञांची तत्काळ नियुक्ती काही दिवसांसाठी करण्यात आली. मेळघाटातील खेड्यापाड्यांत जाऊन हे तज्ञ डॉक्टर माता आणि बालकांची तपासणी करत आहेत. परंतु, बालकांसाठी सर्दी, खोकला, तापासाठी उपयोगी औषध आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली. 

न्युमोनियाने आठ मातांचा मृत्यूऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक बालमृत्यू धारणी तालुक्यात झाले. त्यात न्युमोनियाने बालमृत्यूची संख्या वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात धारणी व चिखलदरा तालुक्यात १२ दिवसांत ११ बालकांचा मृत्यू झाला. गत दोन महिन्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. सहा महिन्यात आठ मातामृत्यू झाले. यात मध्यप्रदेश व बाहेरगावी ५ मृत्यू झाले असून तीन मेळघाटात झाल्याचे आरोग्य विभागाने कळवले.

सहा महिन्यांत ० ते सहा वर्षांच्या आतील २६४ व उपजत शंभर बालकांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यात बालमृत्यू रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ मेळघाटात कार्यरत आहे. वाहनांना टायर व औषधसाठा दिला जात आहे.- सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती 

टॅग्स :Deathमृत्यूMelghatमेळघाटHealthआरोग्य