शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

अब लौट चले... विदेशी पक्ष्यांना परतीचे वेध

By गणेश वासनिक | Updated: March 17, 2023 17:27 IST

अमरावती जिल्ह्यात ३४ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांची नोंद, विदर्भात ६७ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांचे झाले दर्शन

अमरावती : ऋतुचक्र हे निसर्गात होणाऱ्या बदलाचा एक भाग आहे. दरवर्षी नियमितपणे होणारे पक्ष्यांचे स्थलांतर हा या बदलाचाच एक भाग आहे. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत अनेक दूरदेशींचे पाहुणे पक्षी आपल्याकडे येतात. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील समुद्रकिनारे, नद्या, तलाव व इतर पाणथळीची ठिकाणे हे खास पाहुणे व्यापून टाकतात, तर काही रान पक्षीही स्थलांतर करून येतात. मात्र, आता विदेशी पक्ष्यांना परतीचे वेध लागले असून, काही पक्ष्यांनी आपली मायभूमी गाठण्यास सुरुवात केली आहे.

यंदा हिवाळी विदेशी पाहुणे म्हणून आलेल्या ६७ प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांची नोंद विदर्भातील जलाशय, नदी, तलावांवर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती सागर, केकतपूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा, बासलापूर, भिवापूर, वडाळी व छत्री या जलाशयांवर पक्ष्यांनी हजेरी लावली होती. मेळघाट व पोहरा मालखेड राखीव जंगलातदेखील नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील निळोना व दारव्हा तालुक्यातील शिंदी अंतरगाव येथील तलाव, तर वाशीम जिल्ह्यातील महान पिंजर, एकबुर्जी तलावात राजहंस, तर गोंदिया, भंडारा व नवेगाव तसेच अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा, यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती, इसापूर व बेंबळा प्रकल्पातील जलाशय तसेच नाशिक व जळगाव भागातही स्थलांतरित पक्ष्यांची नोंद स्थानिक पक्षिमित्रांनी केली आहे.

भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागातून आपल्याकडे पक्षी येतात. काही पक्षी तर २० हजार ते ५४ हजार कि.मी.पर्यंतचा प्रवास करतात. पक्षी हे साधारणतः ताशी ४० ते ६० कि.मी. च्या वेगाने उडतात, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी दिली.

या पक्ष्यांचे झाले दर्शन

यंदा स्थलांतरित पक्षी कांड्या करकोचा, राजहंस, तनई, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्र्या, लहान रेव टिटवा, पानटिलवा, मोठा पानलावा, कृष्ण ढोक, छोटा टिलवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव, शेंडी बदक, कृष्ण थीरथीरा, निलय, राखी डोक्याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षी आदी पक्ष्यांचे दर्शन झाले आहे.जगण्यासाठी संतुलित वातावरणाच्या शोधार्थ येतात विदेशी पक्षी

पक्षी हे ज्या भागातून स्थलांतर करून येतात, त्या भागात ऋतुनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात.

पक्ष्यांचे स्थलांतर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही पक्ष्यांची पंढरी आहे, कारण भारताच्या ४३ टक्के पक्षी एकट्या महाराष्ट्रात आढळतात. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या या पक्ष्यांसाठी तलाव व नद्या प्लास्टिकमुक्त ठेवणे आवश्यक आहे. अधिवास जपून संवर्धन व संरक्षण करणे हे वनविभाग व पक्षीमित्रांसमोरील आव्हान आहे.

- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती

टॅग्स :wildlifeवन्यजीवenvironmentपर्यावरणAmravatiअमरावती