अमरावती विभागात ३२ पीएसआयच्या बदल्या, आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 21:31 IST2020-11-04T21:30:44+5:302020-11-04T21:31:21+5:30
ग्रामीण पोलिसांत फेरबदल : पोलीस उपमहानिरीक्षकांचे आदेश जारी

अमरावती विभागात ३२ पीएसआयच्या बदल्या, आदेश जारी
अमरावती : विभागात परीक्षेत्रातील ३२ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी अमरावती परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले. सदर बदल्या नियमित प्रशासकीय बदल्या असल्याचे पोलीस विभागाने सांगितले.
बदल्या झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे आणि बदली झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण कंसात नमूद केले आहे.
अमरावती जिल्हा- राजेश जवरे(अमरावतीहून अकोला), आकाश महल्ले( अमरावतीहून वाशिम), राजेश पुरी (अमरावतीहून यवतमाळ), वैभव चव्हाण, प्रदीप कांबळे, शरद भागवतकर( अमरावती जिल्हांतर्गत बदली), शिवाजी टिपुर्णे (अमरावतीहून यवतमाळ),धीरज गुल्हाणे, हरीहर बोरे(अमरावती जिल्ह्यातच बदली)
अकोला जिल्हा- नितीन सुशिर(अकोला जिल्हांतर्गत), सागर हटवार (अकोल्याहून वाशिम) रत्नदीप पळसपगार (अकोल्याहून बुलडाणा), रीतेश दीक्षित (अकोला जिल्हांतर्गत)
बुलडाणा जिल्हा - सूरज काळे, नितीन कुमार इंगोले (बुलडाणा जिल्हांतर्गत बदली), अरुण मुंढे (बुलडाण्याहून अकोला), किरण खाडे (बुलडाणा जिल्हांतर्गत), विनीत घाटोळ, प्रदीप घटे( बुलडाण्याहून यवतमाळ), स्वप्नील रणखांब, सिद्धेश्वर उमाळे, ईश्वर सोळंके (बुलडाणा जिल्हांतर्गत), सागर भारसकर, संदीप बारींगे, (बुलडाण्याहून यवतमाळ),
यवतमाळ जिल्हा - येथून राजाभाऊ घोगरे( यवतमाळ जिल्हांतर्गत), दिनकर राठोड (यवतमाळहून वाशिम), सत्यजित मानकर (यवतमाळहून अकोला), दर्शन दिकोंडवार (यवतमाळ जिल्हांतर्गत), सुयोग महापुरे (यवतमाळहून अमरावती ग्रामीण)
वाशिम जिल्हा - चंदन वानखडे (वाशिम जिल्हांतर्गत) दिनेश कायंदे व गणेश सुर्यवंशी (वाशिमहून अकोला) येथे बदली करण्यात आली आहे.