शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

टेंब्रुसोंड्यात दगावली ३० बालके

By admin | Updated: September 3, 2016 00:08 IST

तालुक्यांतर्गत येणाऱ्या टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचा बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी पंचनामा केल्याने आरोग्य प्रशासनात.....

 किशोर बोरकरांनी जाणल्या व्यथा : आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार चव्हाट्यावर चिखलदरा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचा बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी पंचनामा केल्याने आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. मागील पाच महिन्यांत या केंद्रांतर्गत ३० बालकांचा व एक माता मृत्यू झाल्यावरसुद्धा आरोग्य यंत्रणेतर्फे तज्ज्ञ व कायमस्वरुपी डॉक्टरासह, पदाधिकाऱ्यांचे शेरे फाडून फेकणे, औषधी नसणे आदी संताप व्यक्त करणाऱ्या बाबी उघडकीस आल्यात.बुधवारी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर बोरकर, मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, पं. स. सभापती दयाराम काळे, जि. प. सदस्य वनमाला खडके, जयंत खडके, बन्सी जामकर, सुरेश खडके, भुलाबाई खडके, राजेंद्र भुरेकार, लोहकरे आदींनी वादग्रस्त टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत पंचनामा केला. अनेक सुविधा बेपत्ता असून विना डॉक्टरच्या या दवाखान्याला पूर्वीच संतप्त नागरिकांनी कुलूप ठोकले.रुग्णांशी साधला संवादसरचिटणीस किशोर बोरकर व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ऐकल्या. बाबू जावरकर, गणेश खडके, भुलाबाई बेलकर यांनी आरोग्य केंद्र केवळ नावापुरते असून कुठल्याच प्रकारचा उपचार होत नसल्याचे सांगितले. शासकीय सुविधा व आरोग्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभसुद्धा दिला जात नसल्याचे सांगण्यात येते.फिरत्या पथकाचे डॉक्टरटेंब्रुसोंडा येथील वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणात गेले, तर सहायक अधिकारी सुषमा देशमुख यांना आपल्या अधिकाऱ्याची माहिती नाही, दोन महिन्यांचे वेतन नाही, एस. एस. मरस्कोल्हे तीन महिन्यांपासून रजेवर आहेत. आर. व्ही. लोणारे फिरते पथक हे केंद्रावर आहेत. दोन कर्मचारी वही लिहून पूर्वीच गैरहजर आढळले. उपस्थितीचे रजिस्टर किंवा रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले जेवण कागदोपत्री आढळले. (तालुका प्रतिनिधी)शासनाला जाब विचारूमेळघाटातील आरोग्य यंत्रणा पावसाळ्यात सज्ज ठेवण्याचे सांगत शासनाला या बाबींचा जाब विचारून आदिवासी हक्काचा निधी गेला कुठे? याची चौकशीची मागणी करणार असल्याचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मेळघाटात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होत असताना प्रशासन बेदखल असते, ही खेदजनक बाब आहे. न्यायालयाचा अवमान असून आदिवासींना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचे किशोर बोरकर यांनी सांगितले. सर्वत्र नन्नाचा पाढा डॉक्टर नाही, औषध नाही, तर कुठलेच रजिस्टर प्रमाणित केलेले नाहीत. त्यावरही कळस म्हणजे पदाधिकारी यांच्या भेटीदरम्यान लिहिलेले शेरेबुकातील पान फाडून फेकण्यात आले. ३० प्रकारच्या औषधी नसल्याने, विना डॉक्टर विना औषध असा कारभार आदिवासींच्या जिवाचा खेळ करणारा या भेटीदरम्यान उघडकीस आला. सन १९८४ पासून या आरोग्य केंद्राची स्थापना झाल्यावर तब्बल २० वर्षांपासून येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्थानांतरणसुद्धा न झाल्याने काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्याप्रमाणे आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. भोंगळ कारभारटेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३९ गावांचा भार आहे. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत ० ते ६ वयोगटातील ३० बालके दगावल्याची नोंद झाली आहे. वाढत्या क्रमवारीत बालमृत्यूची संख्या असताना आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार आदिवासींच्या जिवावर बेतणारा ठरला असल्याचे सत्य आता पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात उघडकीस आला आहे.