शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

२९६ जणांनी पगारवाढ स्वीकारली; २१५० कडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे  कर्मचारी तीन आठवड्यांपासून संपवार आहेत. शासनाने भरघोस पगारवाढ दिल्यानंतर अमरावती विभागातील २ हजार ४४१ कर्मचाऱ्यांपैकी २९६ कर्मचारी कामावर परतले. २१५० कर्मचाऱ्यांनी पगारवाढीवर नाखुशी दर्शविली. त्यामुळे अजूनही हे कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आठ एसटी आगारातील ६६७ बसेसची चाके थांबलेलीच आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले. परिणामी ३६७ बस आगारात असताना केवळ अमरावती आगारातून गुरुवारी अमरावती-वरूड आणि वरूड-अमरावती या दोन एसटी बसच्या फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. खासगी प्रवासी वाहतुकीला कंटाळलेल्या प्रवाशांनाही एसटीची चाके गतिमान हवी आहेत. 

२९६ जणांनी स्वीकारली पगार वाढअमरावती विभागातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी २१५० कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपवार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासनाची पगारवाढ नाकारली आहे. कामावर परतलेल्या  २९६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचारी रीतसर रजेवर आहेत. प्रत्यक्षात २८१ कर्मचारी कामावर आले आहेत. यामध्ये यांत्रिकी, नऊ कार्यालयीन चालक, प्रशासकीय, पर्यक्षकीय आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खासगी गाड्यांची सवय झाली 

एसटी बसेस जवळपास महिना होत आहे. बंद आहेत. त्यामुळे गावखेड्यातून शहरात जायचे झाल्यास नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून हा प्रश्न सोडवावा.- विलास रेहपांडे, प्रवासी

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. बस बंद असल्याने खासगी वाहने जादा भाडे आकारून प्रवाशाची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू होणे आवश्यक आहे.- मोहन बैलके,प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप