अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:19 PM2019-11-14T16:19:30+5:302019-11-14T16:19:37+5:30

पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल; पश्चिम विदर्भात २०.२५ लाख शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका

22.44 lakh hectares are affected, demand of Rs 1543.67 crore In Amravati | अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

अमरावती विभागात २२.४४ लाख हेक्टर बाधित; १५४३.६७ कोटींची मागणी 

Next

अमरावती : विभागात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याने विभागीय आयुक्तांनी तसा अहवाल महसूल विभागाच्या उपसचिवांना पाठविला आहे. यामध्ये ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे १५४३ कोटी ६७ लाखांच्या अपेक्षित निधीची मागणी केली आहे.

अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे विभागात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश २९ ऑक्टोबरला दिले होते. त्यानुसार गुरुवारी हा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील १२ लाख २६ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

कपाशीचे ८ लाख २१ हजार २७० हेक्टर, खरीप ज्वारी ४२ हजार ९६ हेक्टर, तुरीचे ५१ हजार ३४३ हेक्टर, मका पिकाचे ३१ हजार ३४१ हेक्टर, धान पिकाचे ५ हजार ५३८ हेक्टर, उदीड पिकाचे ९ हजार २८९ हेक्टर व इतर खरीप पिकांचे ३६ हजार ६६९ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी राट्रीय आपदा कोषातून (एनडीआरएफ) १५१२ कोटी २८ लख ९८ हजारांच्या अपेक्षित मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांनी महसूल विभागाकडे केली आहे.

 जिल्हा व पिकनिहाय नुकसान (हेक्टर/लाखात)

जिल्हा         शेतकरी       सोयाबीन       कपाशी        बाधित क्षेत्र      अपेक्षित निधी
अमरावती    ३७४८०४    २१२३२९        १३५४७२      ३७३०१९        २५३६५.३५    
अकोला       २९७६६८     १७३४०५      १५३०९५      ३६३०५९       २४८२४.७१
यवतमाळ    ४३२१००      २०९६८६      ३०२१४७      ५२१००४        ३५४२८.२७
बुलडाणा    ६३४०७९      ३७१२५४      २०९९२०      ६८१२०५        ४६३२१.९८
वाशीम        २४६३९४     २५९७०१      २०६३५        २८३६५६        १९२८८.६७
एकूण       १९,८५,०४५   १२,२६,३४६   ८,२१,२७०   २२,२३,९५५    १५१२,२७९८

असे आहे बागायती व फळपिकांचे नुकसान

विभागात २७ हजार ५६९ शेतकºयांच्या १२ हजार २३ हेक्टरमधील बागायती पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये केळी/पपई ८६१ हेक्टर, भाजीपाला ९३३८ हेक्टर, हरभरा ४०७ हेक्टर, ५.४० हेक्टर गहू, ४.४ हेक्टर मका, १५५ हेक्टर हळद व इतर पिकांचे १२५० हेक्टरमध्ये नुकसान झाले. यासाठी १६ कोटी २३ लाख १७ हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली. 

विभागात १२ हजार ५८३ शेतकºयांच्या ८४१९ हेक्टरमधील फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. यामध्ये ४०३२ हेक्टरमधील संत्रा, मोसंबी, लिंबू, ८७ हेक्टरमध्ये आंबा, ९०८ हेक्टरमध्ये डाळिंब, १९३७ हेक्टरमध्ये केळी, पपई, ४८ हेक्टरमध्ये पेरू, २०६ हेक्टरमध्ये द्राक्ष व इतर फळपिकांचे ११९८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. यासाठी १५ कोटी १५ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: 22.44 lakh hectares are affected, demand of Rs 1543.67 crore In Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.