शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

तीन पंचायत समितींमध्ये २२१ अर्ज दाखल

By admin | Updated: November 8, 2014 22:30 IST

जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूररेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण २२१ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवस्यात उमेदवारांची सर्वाधिक संख्या

पंचायत समिती निवडणूक : सर्वाधिक तिवस्यात, धामणगावात कमी उमेदवारअमरावती : जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूररेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण २२१ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवस्यात उमेदवारांची सर्वाधिक संख्या असून धामणगाव तालुक्यात सर्वात कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तिवसा तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणांसाठी १०२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यात वरखेड गणात २०, तिवसा २९, कुऱ्हा १४, मोझरी १२, मार्डा ५ तर वऱ्हा सर्कलमधून २२ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.चांदूररेल्वे तालुक्यात एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यात राजुरा गणातून १६, घुईखेड १२, मालखेड ६, सातेफळ १०, आमला ९ तर पळसखेड गणातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच धामणगाव पंसच्या निवडणुकीत शनिवारी शेवटच्या दिवशी आठ गणांमधून ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात जुना धामणगावमधून सर्वाधिक ९ तर तळेगाव दशासर गणातून चार अर्ज प्राप्त झाले.अंजनसिंगी सर्कलच्या सर्वसाधारण जागेसाठी अवधुत दिवे, भाजपतर्फे गणेश राजनकर, राष्ट्रवादीचे प्रवीण राजनकर, बसपचे सिध्दार्थ घरडे, अपक्ष उमेदवार वामन म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जुना धामणगाव सर्कलमधून काँग्रेसतर्फे अजय उत्तम तुपसुंदरे, भाजपचे सचिन गणेश पाटील, राष्ट्रवादीतर्फे विजय शेषराव बोरकर, बसपचे योगेश एकनाथ पाटील, शिवसेनेतर्फे प्रशांत वाल्मीक भगत, भारिपचे नरेश शेषराव काळबांडे, अपक्ष अनिल सोनटक्के, रवींद्र गवई, हनुमंत वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़