पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:22 PM2019-07-24T16:22:30+5:302019-07-24T16:43:25+5:30

सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.

22 percent crop loan in vidarbha | पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

पश्चिम विदर्भात २२ टक्केच पीककर्ज वाटप 

Next
ठळक मुद्देसरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे.आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

अमरावती - सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असताना पश्चिम विदर्भात खरिपाचे २२ टक्केच कर्जवाटप झाले आहे. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना बँका माघारी पाठवित असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीयीकृत बँका जुमानत नसल्याने या बँकांवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

विभागात १ जून ते २४ जुलै या कालावधीत पावसाची ३५०.३ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १९३ मिमी पाऊस पडला. ही ५७ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांपैकी ५४ दिवस पार झाले असताना ४७ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे किमान पाच लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांचा नन्नाचा पाढा आहे. अमरावती विभागात यंदाच्या खरिपासाठी ८५४९ कोटी ३२ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत २,५७,३७९ शेतकऱ्यांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी १९१५ कोटी ४५ लाखांचे कर्जवाटप केले. ही २२.४० टक्केवारी आहे.  

विभागात जिल्हा सहकारी बँकांना २३०५ कोटी ६९ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,५३,२५३ शेतकरी खातेदारांना २,३८,५७३ हेक्टर क्षेत्रासाठी ९६४.८७ कोटीचे वाटप करण्यात आले. ही ४१.८५ टक्केवारी आहे. यामध्येही यवतमाळ जिल्हा बँकेचे ७५ टक्के कर्जवाटप असल्याने टक्केवारी सुधारली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ५४११ कोटींचे लक्ष्यांक असताना ९३,३४९ शेतकरी खातेदारांना ८५४.३१ कोटींचे वाटप करण्यात आले. १५.७९ टक्केवारी आहे. ग्रामीण बँकांना ८३२.५८ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आज तारखेपर्यंत १०,७७७ शेतकºयांना ९६.२७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही ११.५६ टक्केवारी आहे. केवळ  जिल्हा सहकारी बँकाचे कर्जवाटपाच्या वाढीव प्रमाणावर विभागाचे वाटप २२ टक्के दिसून येत आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष्यांक असणाºया राष्ट्रीयीकृत बँका  कर्जवाटपात माघारल्या आहेत. शासनाद्वारा दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना कर्जवाटपाचा आढावा घेण्याच्या सूचना असताना कर्जवाटपात दर आठवड्यात फक्त एक टक्केच सुधारणा झालेली आहे.

कर्जवाटपात वाढ व्हावी यासाठी तालुक्यांतील मोठ्या गावांमध्ये मेळावे घेण्याचे शासनादेश आहे. जिल्हा बँकांद्वारा वाटपाच्या टक्क्यात सुधारणा आहे. मात्र, व्यापारी बँका माघारल्याने त्यांनी वेग वाढविण्याची सूचना केली आहे.

- राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटपाची सद्यस्थिती (कोटी)

जिल्हा           लक्ष्यांक        सभासद       वाटप        टक्का
अमरावती     १६८५००.००    ३३२८७      ३३२७३.११    १९.७५
अकोला        १३९८७८.००    ३४७३५      ३१४०६.४३   २२.४५
वाशीम         १५३०००.००     ३५०४९      २८२३८.६६   १८४६
बुलडाणा      १७७३७७        ४०२०१३०   १६२२०.४०    ९.१४
यवतमाळ    २१६१७६.६८    १३४१७८    ८२४०७.१०    ३८.१२
एकूण          ८५४९३२.०८    २५७३६९  १९१५४५.७०  २२.४०

 

Web Title: 22 percent crop loan in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.