अमरावती शहरात सहा महिन्यांत २० खून, हल्ल्यात २३ जण मरता-मरता वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:55 IST2025-07-19T15:51:11+5:302025-07-19T15:55:52+5:30
Amravati : अलीकडे शहराचा खूपच विस्तार झाला आहे. त्यामुळे तपोवन व एमआयडीसी या भागात नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे,

20 murders in six months in Amravati city, 23 people survived the attack
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर आयुक्तालयात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण २० खून नोंदविले गेले, तर खुनाचा प्रयत्न या शीर्षकाखाली एकूण २३ एफआयआर नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहा महिन्यात खुनाच्या गुन्ह्यात सहाने वाढ नोंदविली गेली. मात्र, त्याचवेळी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सातने घट नोंदविली गेली.
कोल्ड पत्नीचा ब्लडेड मर्डर करून तिचा मृतदेह घरात दडवून पती पसार झाला होता. २ जानेवारी रोजी भीमटेकडी रोडवरील भोवते ले आऊटमध्ये ती घटना उजेडात आली होती, तर १ फेब्रुवारी रोजी तपोवन परिसरातील संस्कृती नामक तरूणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी रहाटगाव येथील फार्म हाऊसमध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. त्यात तीन दिवसांनी मृत पतीविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २ मार्च रोजी स्थानिक मसानगंज भागात आदर्श गुप्ता याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्येच हार्डकोअर क्रिमिनल गोंडीचा खून झाला होता.
वसंत चौकात फायर
४ एप्रिल रोजी वसंत चौकातील एका पानमटेरियल दुकानावर देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. गुटख्याची तस्करी व वर्चस्ववादातून घडलेल्या त्या घटनेमुळे शहर हादरले.
रागाने बघितले तरीही चाकू
वाहनाचा कट जरी लागला तरी तरूण गुन्हेगारांकडून चायना चाकू उगारला जातो. रागाने बघितले तरीही चाकू काढल्याचे उदाहरणे आहेत.
शहरात नशेखोरीला उत
शहरात गेल्या काही वर्षांपासून नशेखोरीला उत आला आहे. शहरात अलीकडे एमडी ड्रग्सदेखील पकडण्यात आले. तर काही ठिकाणांहून गांजादेखील जप्त करण्यात आला.
सहा महिन्यात किती खून ?
शहराचा तार झाला के तपोवन पडीसी या या पोलिस गरज आहे. शहरातील दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते जून या कालावधीत २० जणांचे खून करण्यात आले. तर २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
क्राईमची दमदार कारवाई
बहुतांश खुनाच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात शहर गुन्हे शाखेची दोन्ही युनिट फ्रंटफूटवर राहिली. क्राईम युनिटनेच खुनाच्या अनेक आरोपींचा त्वरेने शोध लावला.
२३ जण मरता मरता वाचले
शहर आयुक्तालयात गेल्या सहा महिन्यात बीएनएसच्या कलम १०९ अन्वये २३ एफआयआर नोंदविले गेले. त्या २३ जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते मरता मरता वाचले.
सर्वात जास्त खून घडले खुन्नसमधून, वैमनस्यातून
यंदाच्या पहिल्या सहा महिन्यात २० जणांचे खून करण्यात आले. त्यात खुनाच्या सर्वाधिक घटना या आपसी वैर, वर्चस्ववाद व खुन्नस दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निरीक्षण आहे.
"शहराची व्याप्ती अलीकडे अधिकच वाढली आहे. त्यामुळे पोलिसांवरदेखील अधिक ताण येतो. यंदाच्या सहा महिन्यात खुनाचे गुन्हे वाढले असले, तरी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मोठी घट झाली आहे."
- शिवाजीराव बचाटे, एसीपी, क्राईम