शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पश्चिम विदर्भात २० लाख हेक्टरील पीक बाधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 4:07 PM

परतीच्या पावसाचा ६८३५ गावांना फटका; १७ लाख २० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावती : पश्चिम विदर्भात १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने किमान १९ लाख ९३ हजार १३२ हेक्टरमधील खरिपाची पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्राच्या ६३.९० टक्के क्षेत्रातील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. विभागात १७ लाख ३६ हजार २५५ शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

विभागीय आयुक्तांच्या प्राथमिक अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार ५९८ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ६६२ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ४ लाख ८६ हजार ५३० हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख ५१ हजार ४०४ हेक्टर व वाशीम जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या सर्व क्षेत्रात पंचनामे आता अंतिम टप्प्यात असून, साधारणपणे बुधवारी विहित प्रपत्राच्या माहितीनुसार शासनाला अहवाल सादर होणार आहेत.

अमरावती विभागात यंदाच्या हंगामात एकूण ३१ लाख १८ हजार ७०० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पावसात खंड राहिल्याने मूग व उडीद ही ६० दिवसांच्या कालावधीतील पिके बाद झाली. कमी पावसामुळे सोयाबीनची दुबार पेरणी बहुतांश क्षेत्रात करण्यात आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच ऑगस्टपासून पावसाने दीड महिने जेरीस आणले. यात पिकांची वाढ खुंटून कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. आता सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असताना तब्बल दहा दिवस परतीच्या पावसाने झोडपून काढले. शेतात पाणी साचल्याने उभे पीक सडले. कपाशीची बोंडे सडली आहेत. कापूस ओला झाला.  

सरकीला कोंब फुटले. शेतातील उभे सोयाबीन जाग्याबर सडले. गंजीत कुजले.  शेंगाला बिजांकुर फुटले, मका, धान व इतर पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कृषी विभागाने नजरअंदाज अहवाल सादर केला. त्यात १२ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. प्राथमिक अहवालानुसार १९ लाख ९३ हजार १३२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बाधित क्षेत्राची आणखी क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) 

जिल्हा         गावे         शेतकरी         क्षेत्रअमरावती    १६०६       ३२०१९९    ३५१५९८अकोला       १००६       २९३५८८    ३२३६६२यवतमाळ    २००८       ४६७४६६    ४८६५३०बुलडाणा     १४२०       ४८०६४५    ५५१४०४वाशिम        ७९५        १७४३५७    २७९९३८एकूण        ६८३५१७   १७३६२५५    १९९३१३२

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावतीRainपाऊस