बेसखेड्यात २० कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:13 AM2021-01-23T04:13:38+5:302021-01-23T04:13:38+5:30

पान ३ चांदूर बाजार : कोंबड्यावर सध्या बर्ड फ्लूचा संसर्ग सुरू असताना, तालुक्यातील बेसखेड्यात २० कोंबड्या अज्ञात रोगाने ...

20 hens die in Beskheda | बेसखेड्यात २० कोंबड्यांचा मृत्यू

बेसखेड्यात २० कोंबड्यांचा मृत्यू

Next

पान ३

चांदूर बाजार : कोंबड्यावर सध्या बर्ड फ्लूचा संसर्ग सुरू असताना, तालुक्यातील बेसखेड्यात २० कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर कोंबड्या नेमक्या कशामुळे दगावल्या, याची खात्री करून घेण्यासाठी पशुपालक रवी पाटील यांनी एक मृत कोंबडी चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणली असता, तेथे नमुना घेण्यासाठी एकही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याची तक्रार रवी पाटील यांनी केली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे पशुपालक रवी पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बकऱ्या, गाई, कोंबड्या आहेत. अशातच २१ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्याकडील गावरानी प्रजातीच्या २० कोंबड्या एकाच वेळी दगावल्याने लक्षात आले. मृत कुक्कुट घेण्याकरिता प्रथम नकार देणाऱ्या चांदूरबाजार येथील पशू अधिकाऱ्यांनी पशुपालकाला लेखी पत्र मागितले, तसेच मृत कोंबडीचा नमुना तपासणीसाठी सहायक पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याचे पत्र लिहून देण्यात आले. यापूर्वी दोन दिवसांआधी तालुक्यातील आखतवाडा येथील पशुपालकाचे २० ते २५ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याची माहिती आहे.

------

Web Title: 20 hens die in Beskheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.