शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हा येथे पाणी पुरवठ्यासाठी १८ लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 00:06 IST

येथील तात्पुरत्या पूरक नळयोजनेच्या अंदाज पत्रकास शासनाद्वारे १८ लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून ....

ग्रामस्थांना दिलासा : यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा कुऱ्हा : येथील तात्पुरत्या पूरक नळयोजनेच्या अंदाज पत्रकास शासनाद्वारे १८ लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पाणी पुरवठ्याचा हा प्रश्न मार्गी लागला आहे. येथे १३ व्या वित्त आयोगाचा शिल्लक असलेल्या निधीमधून विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले होते, तसेच कुऱ्हा नजीक असलेल्या जामठी शेत शिवारात विहिर असल्यामुळे जामठी ते कुऱ्हा या ३ कि.मी. अंतराची पाईपलाईन काम निधीअभावी रखडले होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी आमदार यशोमती ठाकूर यांचेकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर सदर योजनेच्या १८ लक्ष रुपयांच्या खर्चाच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे या योजनेला लोकवर्गणीची अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. उन्हाळ्याला प्रारंभ होत असताना सर्वत्र पाणी टंचई निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र या योजनेकरिता जलदगतीने निधी मंजूर करण्यात आल्यामुळे ही योजना लवकरच पूर्ण होऊन ग्रामस्थांना नियमितपणे पाणी पुरवठा होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत १ मार्च रोजी नवनिर्वाचित जि.प. सदस्य पूजा आमले, कुऱ्हा पं.स. सदस्य मंगेश भगोले, उपसरपंच सैय्यद जहांगीर, ग्रामपंचायत सदस्य शहजाद पटेल यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उन्हाळा तोंडावर आहे. कुऱ्ह्याची पाणी समस्या सोडविण्याची मागणी होती. सातत्याने पाठपुरावा केला. लोकवर्गणीची अट रद्द करून १८ लक्ष रुपये मंजूर झाले. गावकऱ्यांना पाणी मिळेल, याचा आनंद आहे. - यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा