पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:55 IST2022-06-16T14:51:13+5:302022-06-16T14:55:01+5:30

अमरावती/ परतवाडा : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ...

16-year-old girl raped for consuming drugs; Incident in Amravati | पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना

पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घालून १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; अमरावतीमधील घटना

अमरावती/ परतवाडा : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. १२ जूनच्या रात्री १२.३० ते १३ जूनच्या सकाळी ७ वाजतादरम्यान ही अश्लाघ्य घटना घडली. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी शेख अयाज शेख हुसेन (२५) व सय्यद शोएब सय्यद सलिम (२२, दोन्ही रा. खरपी) यांच्याविरूद्ध सामूहिक बलात्कार, अपहरण, पोक्सो व ॲट्रासिटी अन्वये गुन्हे दाखल केले. १३ जून रोजी रात्री ती पीडिता अत्यंत विदारक व भेदरलेल्या स्थितीत परतवाडा पोलीस ठाण्यात पोहोचली.

तक्रारीनुसार, पीडिता व आरोपी परस्परांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, पीडिता ही तिच्या मामाच्या गावला असताना आरोपींपैकी एकाने तिला तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत घराबाहेर बोलावले. तत्पूर्वी त्यांच्यात टेलिफोनिक संवाद देखील झाला. धमकीला घाबरून ती १२ जून रोजी रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास मामाच्या घरातून बाहेर पडली. आरोपींनी तिचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. चारचाकीत असताना तिला पेढ्यात नशेचा पदार्थ खाऊ घातला. त्यामुळे तिला गुंगी आली.

मल्हारा ते परतवाडा दरम्यान दोन्ही आरोपींनी तिचेवर सामूहिक बलात्कार केला. रात्रभर चारचाकीत ठेवत १३ जूनला सकाळी ७ च्या सुमारास तिला आरोपींनी तिच्या राहत्या गावात सोडून दिले. झालेला प्रकार पालकांजवळ सांगितला. तथा १३ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास ती परतवाडा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला धीर देत तिचे बयाण नोंदवून घेतले. तथा १४ जून रोजी पहाटे ४ च्या सुमारास दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

१२ ते १३ जूनदरम्यान सामूहिक बलात्काराची ती घटना घडली. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पैकी सय्यद शोएबला अटक करण्यात आली.- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

Web Title: 16-year-old girl raped for consuming drugs; Incident in Amravati