जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी १६ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:34+5:302021-01-08T04:38:34+5:30
आर्थिक वर्षाच्या अखेरीस विकासकामांना चालना अमरावती : कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक विकासासाठी आमदारांना मिळणारा दोन कोटींचा निधी त्यांना प्राप्त ...

जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी १६ कोटींचा निधी
आर्थिक वर्षाच्या अखेरीस विकासकामांना चालना
अमरावती : कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक विकासासाठी आमदारांना मिळणारा दोन कोटींचा निधी त्यांना प्राप्त झाला. यापैकी एक कोटी रुपये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मिळाले आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विकासकामांना गती मिळणार आहेत.
जिल्ह्याच्या विधिमंडळ सदस्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी जाहीर झाला होता. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पन्नास लाख रुपये वितरित झाले होते. आता ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित निधी दिला जाणार आहे. लोकप्रतिनिधींना मिळणारा विकास निधी परत जात नाही. तो पुढच्या वर्षीसुद्धा वापरता येतो. रस्ते, पाणी, शाळा संरक्षणभिंत, स्मशानभूमी, उद्याने, वाचनालय, शालेय साहित्य आणि इतर तत्सम कामांसाठी लोकप्रतिनिधी या निधीचा वापर करतात. स्थानिक आमदार विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ करिता आतापर्यंत जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांना प्रत्येकी दोन कोटी असा १६ कोटी रुपये निधी मिळाला आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षात पहिला हप्ता देण्यास वित्त विभागाने संमती दर्शवली होती. तो निधीही मंजूर करण्यात आला. प्रारंभी आमदारांना ५० लाख मिळाले होते. मात्र, कोरोना संकटाने डोके वर काढल्याने यापैकी २० लाखांचा निधी देण्यात आला होता. तो कोरोनाच्या उपाययोजनेसाठी वापरण्याची सक्ती करण्यात आली होती. आता कोरोना संकट कमी होत असल्याने विकासाच्या कामासाठी हा निधी वापरता येईल.
बॉक्स
रस्ते विकास रखडले
आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण भागातील गावांमध्ये रस्ते, पूल बांधणी तथा पायभूत सुविधांची कामे केली जातात. सभागृह, व पाणी व नळ योजनांवर निधी खर्च होतो. ही कामे सुरू होत आहेत.
आरोग्य क्षेत्रातही निधी
यंदा जिल्ह्यातील आमदारांनी आरोग्य क्षेत्रातही आमदार निधीतून मदत दिली आहे. त्याचा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी चांगला उपयोग झाला.
कोट
राज्य शासनाच्या वित्त विभागाने आमदारांना स्थानिक निधी पूर्णत: वापरण्यास परवानगी दिली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपल्यानंतर शासनाकडून प्राप्त झालेला निधी हा आमदारांना देण्यात येईल.
वर्षा भाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी
जिल्ह्यातील विधानसभा सदस्य ८
विधान परिषद सदस्य १