मालखेड येथे १५ व्या वित्त आयोगातून करीत आहे नालीचे अर्ध्यातून बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:31+5:302021-06-23T04:10:31+5:30

गटविकास अधिकारी यांना निवेदन, पं. स. सदस्य अमोल होले यांचे नेतृत्व चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड (रेल्वे) ...

The 15th Finance Commission is constructing half of the drain at Malkhed | मालखेड येथे १५ व्या वित्त आयोगातून करीत आहे नालीचे अर्ध्यातून बांधकाम

मालखेड येथे १५ व्या वित्त आयोगातून करीत आहे नालीचे अर्ध्यातून बांधकाम

Next

गटविकास अधिकारी यांना निवेदन, पं. स. सदस्य अमोल होले यांचे नेतृत्व

चांदूर रेल्वे : तालुक्यातील मालखेड (रेल्वे) येथील वार्ड क्रमांक १ मधील नालीचे बांधकाम १५ व्या वित्त आयोगातून अर्ध्यातून करण्यात येत आहे. ग्रा. पं. प्रशासनाच्या या मनमानी कारभाविरोधात चांदूर रेल्वेच्या गटविकास अधिकारी यांना मंगळवारी पंचायत समितीचे सदस्य अमोल होले यांच्या नेतृत्वात मालखेड (रेल्वे) येथील नागरिकांनी निवेदन दिले.

वार्ड क्र. मधील सदर नालीचे बांधकाम करतांना रऊफ कुरेशी यांच्या घरापासून ते दिलीप भिवगडे यांच्या घरापर्यंत मंजूर करण्यात आले होते. परंतु सदरचे बांधकाम सुरू करण्यात येत असतांना मात्र मधातून म्हणजेच देवीदास पाटील यांच्या घरापासून सुरू करण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता सदर नालीचा नैसर्गिक उतार हा रऊफ कुरेशी यांच्या घराकडून ते दिलीप भिवगडे यांच्या घराकडे आहे. केवळ गावातील राजकीय वैमनस्यातून सदरची नाली ही अर्ध्यातून सुरू करण्यात आली आहे. राजकारण करून ४० ते ५० फूट अंतर सोडून या नालीचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे निवेदनातून म्हटले आहे. त्यांना नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामध्ये संबंधितांकडून मनमानी प्रमाणे कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सदरची नाली ही रऊफ कुरेशी यांच्या घरापासून घेतल्यास नैसर्गिक उतारामुळे कुठेही पाणी तुंबणार नाही. परंतु ग्रामपंचायत सदस्य व सचिव यांच्या हेकेखोरीमुळे सदर नालीचे बांधकाम अर्ध्यातून सुरु झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे स्वतः मोका पाहणी करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा उपोषणाला बसावे लागेल असा इशारा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे. निवेदन देतेवेळी पंचायत समिती सदस्य अमोल होले, अॅड. ललीत कदम, शेख अन्सार, इमरान कुरेशी, शेख शकील कुरेशी, सागर पाटील, अरविंद बनसोड, साहिल पाटील, बोरकर, अवधूत बोरकर, जुनेद खान, गुलाम नबी, आदेश मेश्राम, शेख याकुब, गुलाम मुस्तफा कुरेशी, शिवलाल बोरकर, अब्दुल रउफ कुरेशी आदींची उपस्थिती होती.

(बॉक्समध्ये घेणे)

शाखा अभियंत्यांच्या निर्देशाप्रमाणे काम - ग्रामविकास अधिकारी

चांदूर रेल्वे च्या पंचायत समितीचे शाखा अभियंता यांच्या निर्देशाप्रमाणे सदर काम करण्यात येईल असे मालखेड येथील ग्रामविकास अधिकारी संजय चौधरी यांनी म्हटले.

===Photopath===

220621\img-20210622-wa0017.jpg

===Caption===

photo

Web Title: The 15th Finance Commission is constructing half of the drain at Malkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.