सुसाट 'समृद्धी'वर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत राहणार 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:09 IST2025-11-05T20:04:29+5:302025-11-05T20:09:07+5:30

चोरट्यांनो सावधान : अपघातस्थळांचे लोकेशन कळणार, सुसाट वाहन चालकांवर होणार कारवाई

1500 CCTV cameras on Susat 'Samriddhi'; 'Watch' will be on from Nagpur to Mumbai | सुसाट 'समृद्धी'वर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत राहणार 'वॉच'

1500 CCTV cameras on fast 'Samriddhi'; 'Watch' will be on from Nagpur to Mumbai

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास १५०० कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहेत. नागपूर ते मुंबई समुद्धी महामार्ग गेम चेंजर ठरला असून, ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गावर आता सुविधा निर्माण करण्यासाठी काम केले जात आहे.

सध्या समृद्धी महामार्गावर नागपूर ने जालना, शिर्डी, नाशिक व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. १२० प्रतिकिमी तास कार, तर जड वाहनाकरिता ८० किमी प्रतितास वेग मर्यादा दिलेली आहे. हा महामार्ग अत्यंत गुळगुळीत आणि गतिरोधक नसलेला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. कारण महिन्याला ३ लाख लहान-मोठी वाहने या महामार्गावर धावत असून, माल वाहतूक करणाऱ्या लॉरीज आता या समृद्धी महामार्गाचा उपयोग करताना दिसून येतात.

दिल्लीच्या कंपनीला कंत्राट

नागपूर ते मुंबईदरम्यान समृद्धी महामार्गावर एकूण १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. अत्यंत प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे एका बाजूने ५०० मीटर आणि दुसरा बाजूने ५०० मीटर क्षेत्र व्यापणार हे कॅमेरे बसविण्याचे काम दिल्ली येथील एनसीसी या कंपनीकडे देण्यात आले आहे. उंचावरून ५०० मीटर सरळ आणि २०० मीटर बाजूला नजर ठेवणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात समृद्धीवर कंट्रोल रूम तयार करणार असून, यामध्ये 'एआय'चा वापर होणार आहे. मुंबई हे प्रमुख कंट्रोल रूम असेल.

सीसीटीव्ही कॅमेरे लागण्यास सुरुवात

  • समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग तपासण्यासाठी नव्हे तर समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यास कंट्रोल रूम तत्काळ अपघातस्थळाचे ठिकाण दाखविणार असून, अपघातस्थळी लवकर मदत मिळणार आहे.
  • कारण, सध्या अपघात झाल्यावर वाहनधारकांना वाहन नेमके स्थळ सांगताना अडचण होते. कारण, मध्ये कोणतेही गाव नसते आणि किमी ऐवजी चेनेज यावर स्थळ ठरविले जाते. जे केवळ 'एमएसआरडी'ला कळते. समृद्धी महामार्गावर नागपूर ते वाशिमदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

 

Web Title : नागपुर से मुंबई तक समृद्धि एक्सप्रेसवे पर 1500 सीसीटीवी कैमरे

Web Summary : समृद्धि एक्सप्रेसवे पर नागपुर से मुंबई तक 1500 सीसीटीवी कैमरे लगाए गए। उद्देश्य: वाहनों पर निगरानी, दुर्घटनाओं को कम करना। दिल्ली की एनसीसी एआई-संचालित नियंत्रण कक्षों के साथ इंस्टॉलेशन को संभालती है, ताकि दुर्घटना पर त्वरित प्रतिक्रिया मिल सके।

Web Title : 1500 CCTV Cameras Monitor Samruddhi Expressway from Nagpur to Mumbai

Web Summary : Samruddhi Expressway gets 1500 CCTV cameras from Nagpur to Mumbai. Aim: monitor vehicles, reduce accidents. Delhi's NCC handles installation with AI-powered control rooms for quick accident response.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.