१५० वर्षांची परंपरा असलेलेले वडनेर गंगाई येथे काट्यांवरचे लोटांगण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:14 IST2018-03-27T21:14:48+5:302018-03-27T21:14:48+5:30
दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे. वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिस-या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झाले.

१५० वर्षांची परंपरा असलेलेले वडनेर गंगाई येथे काट्यांवरचे लोटांगण पूर्ण
- अनंत बोबडे
अमरावती - दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई येथे रिंगणीच्या काट्यांवर लोटांगण मंगळवारी पार पडले. ही परंपरा १५० वर्षांची आहे.
वडनेर गंगाई येथे झगेश्वर महाराजांचे मंदिर आहे. रामनवमीच्या तिस-या दिवशी या संस्थाच्यावतीने आयोजित लोटांगणात गावातील सानथोर सहभागी झाले. विज्ञान युगात अंधश्रद्धेला कुठेही थारा नसला तरी काही गावांत जुन्या परंपरेची जपणूक केल्या जात आहे. लोटांगण घेतल्यावर नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होत नसल्याची भावना भाविकांमध्ये आहे. सरपंच दिनकरराव देशमुख, संस्थानचे अध्यक्ष प्रवीण प्रभाकरराव लाजूरकर यांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले.
काट्यवरून लोटांगण घेणे ही कुठलीही अंधश्रद्धा नसून यामुळे आम्हाला दैव शक्ती प्राप्त होऊन एक प्रकारची शरीराला ऊर्जा मिळते.
- माधव चौधरी, भाविक