शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवर सीईओंचे नियंत्रण, भ्रष्टाचाराला बसणार आळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:59 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर ‘सीईओं’मार्फत शासनाचे नियंत्रण राहणार आहे.

अमरावती : चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर ‘सीईओं’मार्फत शासनाचे नियंत्रण राहणार आहे.केंद्र शासनाने सन २०१५-१६ पासून १४ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितींना मिळणारा निधी बंद असून, १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना देणे सुरू केले आहे. आपल्या गावच्या योजना गावानेच सुचवून त्या राबवाव्यात, असे शासन धोरण आहे. त्यानुसार ‘आमचं गाव आमचा विकास’ संकल्पना राबवून पाच वर्षांचे आराखडे ग्रामपंचायतींना तयार करण्यास सांगण्यात आले. आतापर्यंत तीन वर्षांच्या विकास आराखड्यानुसार काही कामे झालीत, तर काही सुरू आहेत. तथापी या कामावरून व निधी खर्च करण्यावरून गावागावांत वादंग उठले. परिणामी जिल्हा परिषद व विभागीय आयुक्तांकडे तक्रारी वाढल्यात. अनेक गावांतील सरपंच व ग्रामसेवकांविरूद्ध नागरिकांनी सीईओंकडे तक्रार केली. निधी उपलब्धतेचे मांडलेले अंदाज वस्तूनिष्ठ नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मुख्य सचिव नीला रानडे यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या निधीतून कार्यक्षेत्रातील शाळा, अंगणवाडीतील गुणवत्ता वाढविणे, इमारतीची देखभाल, दुरूस्ती, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा देण्यावर प्राधान्याने लक्ष देणे, दारिद्र्य निर्मूलन आदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय यावर नियंत्रणासाठी जिल्हा संनियंत्रण समितीमार्फत नियमित आढावा बैठक, दफ्तर तपासणीबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निधी खर्चाच्या बाबतीत शासनाचा वचक राहणार आहे.

भ्रष्टाचाराला बसणार आळाशासनाच्या जाचक अटीमुळे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करणा-यांना आळा बसणार आहे. शिवाय सत्ताधारींच्या मनमानीलाही लगाम बसणार आहे. केलेल्या कामांवर सीईओंचे नियंत्रण राहणार आहे. १४ ला वित्त आयोगातून गावाला मिळणा-या भेटी निधी खर्चावर शासनाचा वचक आल्याने आर्थिक शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती