शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी १४ सुपुत्रांचे बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:17 IST

बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५५० युवक देशसेवेत : १०५ जवान होते सीमेवर तैनात

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती / धामणगाव रेल्वे : बलिदान अन् संघर्षातून साकारलले भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्यातील जवान २४ तास खडा पहरा देत आहेत. स्वातंत्र्याचे मोल जोपण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील १४ वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशावर अनेक हल्ले करून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्रांनी केला. १९६५ सालच्या भारत-चीन युद्धापासून अलीकडच्या कारगील युद्धातही अमरावतीच्या जवानांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जिल्ह्यातील १४ जवान, तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान यापूर्वी शहीद झाले आहेत़ विशेष म्हणजे, एकट्या धामणगाव तालुक्यातून आतापर्र्यंत १०५ पुत्रांनी देशसेवेसाठी सैन्यात प्रवेश घेऊन सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावली, तर सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५५० हून अधिक युवक सैन्यात दाखल असून देशसेवा करीत आहेत, अशी माहिती सैन्य अधिकारी धनंजय सदाफळे यांनी दिली.जन्म देणाºया आईपेक्षा भारत मातेला अधिक सन्मान देणारे सीमेवर धामणगाव तालुक्यातील १०५ सैनिक आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सीमा असलेल्या त्रिकोणी भागात भारतीय संरक्षण खात्यातील तीनही विभागात धामणगाव तालुक्यातील सैनिक कार्यरत आहेत़ सावळा व निंबोली हे गाव आजही सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते़ सावळ्यातील चिकटे कुटुंबातील दोन सदस्य सैनिकांचे कार्य पार पडत आहेत, तर निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे, विजय बढीये, ठाकरे, कैकाडे, बुटले, कुºहडकर, यांच्यासह अनेक तालुक्यातील गावांमधील सैनिक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत़धामणगाव शहरातील तब्बल अकरा, तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवसाठी वेचले आहे. शेंदुरजना खुर्द, काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील तरूण सैन्यात भरती झाले आहेत.स्वातंत्र्य लढ्यात कावलीचेही योगदानतालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे असलेल्या कावली या गावाचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिले आहे़ सन १९४२ मध्ये स्वातंत्र्य लढ्याचा संग्राम सुरू असताना येथील गुलाबराव झाडे, देवराव इंगळे यांनी 'चले जाव'चा नारा देत मोठा मोर्चा काढला होता़ त्यावेळी इंग्रजांच्या गुलामी विरूद्ध मोठी चळवळ झाडे व इंगळे या स्वातंत्र्य सैनिकांनी उभारली होती़