पथ्रोटमध्ये १२० होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:57+5:30
दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे.

पथ्रोटमध्ये १२० होम क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट ग्रामपंचायत अंतर्गत १२० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यातील एक जण लंडनमधून दाखल झाला आहे. अन्य व्यक्ती दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, तर काही राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून गावात दाखल झाले आहेत.
दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावपातळीवर जनजागृती करण्याकरिता पथ्रोट येथील सरपंच गोपाळराव कावरे, उपसरपंच शेख अन्नसार शेख दिलावर, सचिव हर्षदा बोंडे, ग्रामपंचायत कर्मचारी राहूल उके, श्रीधर नळकांडे, गिरीधर लिल्हारे, बाबूलाल मेश्राम, शैलेश लिल्हारे, अक्षय वऱ्हेकर यांच्यासह आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक, आरोग्य सेवक यांच्यासह गावसमिती कार्य करीत आहे. ही सर्व मंडळी यावर लक्ष ठेवून आहे.
पथ्रोटची लोकसंख्या १७ हजार असून, सहा वॉर्डांमध्ये विभागली गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जंतुनाशक औषध तसेच ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे. फॉगिंग करण्यात आले असून, गाव स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.