शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कार उलटून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, बोपीनजीक अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 4:42 PM

भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला.

अमरावती - भरधाव कारचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात नागपूर येथील कल्याणी कुटुंबीयातील १२ वर्षीय करणचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोपीनजीक भास्कर फूड्स प्रा.लि. कंपनीजवळ घडली. नागपूरच्या नंदनवन सोसायटीत राहणारे प्रकाश कल्याणी हे पत्नी, मुलगा करण व मुलीसमवेत कारने शेगावी दर्शनासाठी निघाले होते. अमरावती-अकोला मार्गावर लोणी ते बोपीदरम्यान रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यातील खड्डे चुकवित असताना भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याखाली उतरून उलटली. करण हा खिडकीतून बाहेर पडताच त्याच्या अंगावर कार कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे करणचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कल्याणी कुंटुबातील अन्य सदस्य किरकोळ जखमी झालेत. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना कारबाहेर काढण्यास मदत केली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणी पोलिसांनी करणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालयात आणला होता.

टॅग्स :Accidentअपघात