महसूलची ११८.१९ टक्के वसुली

By Admin | Updated: April 1, 2017 00:28 IST2017-04-01T00:28:04+5:302017-04-01T00:28:04+5:30

जिल्ह्यात ३१ मार्च रोजी ११२.४५ उद्दिष्टांच्या तुलनेत ११८.१९ कोटींची महसूल वसुली झाली,....

118.19 percent of Revenue Recovery | महसूलची ११८.१९ टक्के वसुली

महसूलची ११८.१९ टक्के वसुली

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यास १३२.९१ कोटीचे होते उद्दिष्ट
अमरावती : जिल्ह्यात ३१ मार्च रोजी ११२.४५ उद्दिष्टांच्या तुलनेत ११८.१९ कोटींची महसूल वसुली झाली, ही ११८.१९ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक २७.३ कोटींचा वाटा सिंचन प्रकल्पासाठी लागणाऱ्या गौण खनिज रॉयल्टीचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्ह्यात प्रामुख्याने तीन प्रकारात वसुली होते. यामध्ये जमीन, शेती, नझूल भाडेपट्टी, दुसऱ्या प्रकारात गौण खनिज, रेती, क्रशर, माती व तिसऱ्या प्रकारात करमणूक कर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विकास निधी येत आहे. सिंचन प्रकल्पाचे कामे झपाट्याने होत आहे. त्यामुळे गौणखनिज माध्यमातून २७ कोटी ३ लाख व रेतीघाट लिलावातून ३ कोटी उपलब्ध झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील १४२८ नागरिकांनी नझूल भाडेपट्टेसाठी ९५ लाखांचा भरणा करून रहिवासी भाडेपट्टे नियमाकुल केले. मात्र १० टक्के व्यापारी भाडेपट्टेधारकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात मोहीम राबविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. धामणगाव व चांदूररेल्वे तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे थोडाफार महसूलवर परिणाम झाला. मात्र हा करार नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यांनी भरून काढला. तलाठी, तहसीलदार, एसडीओ व सर्वाच्या सहकार्याने जिल्ह्याने लक्ष्य गाठले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विनोद शिरभाते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 118.19 percent of Revenue Recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.