शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पश्चिम विदर्भात ११ हजार मे. टन चाऱ्याची तूट; दुष्काळाच्या झळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 5:04 PM

अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : अत्यल्प पावसामुळे पश्चिम विदर्भात २८ तालुक्यांसह ४७ महसूल मंडळांत शासनाने दुष्काळ जाहीर केला. उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. दुष्काळामुळे वैरणटंचाईची मोठी समस्या भेडसावत आहे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तांच्या माहितीनुसार विभागातील दुष्काळी भागात लहान-मोठी २५ लाख ३६ हजार पशूधन आहेत. या पशूधनाला किमान ११,०२८ मे.टन चा-याची कमी  भासणार असल्याने चा-याची तूट भरून काढायला संबंधित विभागाचे नियोजन सुरू आहे.राज्यातील दुष्काळी गावांत पाणीटंचाईसह वैरणटंचाईची मोठी प्रमाणावर समस्या असल्याने या सर्व ठिकाणी चाºयाचे नियोजन करण्याचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या गावातच चा-याच्या उपलब्धतेसाठी नियोजन सुरू आहे. यात गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती हा पर्याय म्हणून समोर आलेला आहे. प्रकल्पाला कोरड लागल्याने यामधील पाणीसाठा कमी झालेला आहे. या बुडीत क्षेत्रातील जमिनी शेतक-यांना मका, ज्वारी, बाजरी सारखी चारा पिके घ्यायला नाममात्र एक रूपया भाडेपट्टीने शेतकºयांना देण्यात येणार आहे. विभागात ७,३६० हेक्टर गाळपेर क्षेत्रात ६३९ क्विंटल मका, ५१६ क्विंटल ज्वार, ८८ क्विंटल बाजरी व १४ क्विंटल न्यूट्रीफिड बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी विभागात सद्यस्थितीत २,१३५ अर्ज पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झालेले आहेत. राज्यासाठी उपलब्ध १० कोटींमधून विभागात आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ४५६ क्विंटल मका बियाणे प्राप्त आहेत. यामध्ये ४५,६४५ मे.टन हिरवी वैरण व ज्वारीसाठी ५४२ क्विंटल बियाणे प्राप्त आहेत. यामधून ६०,९९५ मे.टन हिरवे वैरण उपलब्ध होणार आहे. असे एकूण १,०६,६०० मे.टन चाºयाचे नियोजन करण्यात आले आहे. २,२७० हेक्टरमध्ये हे नियोजन आहे. यासाठी १४,४९२ अर्ज प्राप्त झाले असून,  यामधून १२,७३९ लाभार्थ्यांची निवड पशुसंवर्धन विभागाने केली आहे.

जिल्हानिहाय पशुधन, लागणारा चाराअमरावती जिल्ह्यातील १०,०३,५५५ पशुधनाला प्रतीमाह १,०५,२४२ मे.टन चाºयाची आवशकता आहे. अकोला जिल्ह्यात ४,५२,४८८ पशुधनाला ५२,३६२ मे.टन., बुलडाणा जिल्ह्यात १०,२०,३३७ पशूधनाला १,१४,७४३ मे.टन, वाशीम जिल्ह्यात ४,५७,५२४ पशुधनाला ५३,५१० मे.टन. व यवतमाळ जिल्ह्यातील ११,४०,३३९ पशुधनाला १,४१,२७७ मे. टन चाºयाची आवश्यकता आहे. अमरावती, बुलडाण्यात चा-याची तूट विभागातील दुष्काळी २८ तालुक्यांत २०,३५,७६४ पशुधन आहे. यासाठी जून २०१९ पर्यंत १९,४३,८८७ मे.टन चारा लागेल. मात्र, १९,५४,९१५ मे.टन चारा उपलब्ध होणार असल्याने ११,०२८ मे.टन चाºयाची तूट भासणार आहे. यामध्ये अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात चाºयाची तूट बासणार नसली तरी अमरावती जिल्ह्यात १,००,५५६ मे.टन. व बुलडाणा जिल्ह्यात १,८३,५३० मे.टन चाºयाची तूट भासणार आहे.