अप्पर वर्धा धरणाची ११ दारे उघडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:08 IST2020-08-14T12:08:48+5:302020-08-14T12:08:58+5:30

धरणाची एकूण ११ दारे ३५ सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत.

11 gates of Upper Wardha Dam opened | अप्पर वर्धा धरणाची ११ दारे उघडली 

अप्पर वर्धा धरणाची ११ दारे उघडली 

अमरावती:अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री मुबलक पाऊस कोसळल्याने अप्पर वर्धा धरणात पाण्याचा येवा गती वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजेपर्यंत धरणाची १३ पैकी ११ दारे उघडण्यात आली आहेत.

अप्पर वर्धा धरणाची लेव्हल ३४२.२२ मीटरची असून धरणात शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी सकाळपर्यंत ९५.१६ टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. धरणामध्ये शुक्रवारी पाण्याची आवक १००१ घनमीटर प्रतिसेकंद असून विसर्ग ६२० घनमीटर प्रतिसेकंद सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाची एकूण ११ दारे ३५ सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. आॅगस्टमध्ये धरणाची अधिकतम लेवल ३४२.१० मीटर ठेवण्यात येते. त्यामुळे निर्धारित न्यूनतम लेवल येईपर्यंत धरणाची दारे उघडे राहतील, अशी माहिती अप्पर वर्धा धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश चव्हाण   यांनी दिली.

Web Title: 11 gates of Upper Wardha Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.