वरूड येथे पकडला १०४ क्विंटल तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:57+5:30

पोलिसांनी मंगळवारी दुपारी गोपनीय माहितीवरून पांढुर्णा चौकातून जप्त केलेल्या एमएच २७ बीएक्स २१७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १०४ क्विंटल तांदूळ २०८ कट्ट्यांमध्ये होता. पोलिसांनी ट्रकसह वाहक-चालकासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हा ट्रक मोर्शी येथून भंडाऱ्याला जात असल्याची कागदपत्रे आढळली.

104 quintals of rice seized at Warud | वरूड येथे पकडला १०४ क्विंटल तांदूळ

वरूड येथे पकडला १०४ क्विंटल तांदूळ

Next
ठळक मुद्देपोलिस कारवाई : तपासासाठी पथक भंडाऱ्याला; चालक-वाहक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : शहरात मंगळवारी दुपारी पडलेल्या ट्रकमधील तांदुळाच्या साठ्याचा मालक अद्यापही पुढे आलेला नाही. यादरम्यान ट्रकमधील २०८ कट्टे भंडारा येथे पोहोचण्यापूर्वी वरूड पोलिसांचे पथक भंडाऱ्याकरिता रवाना झाले. या ट्रकचे चालक-वाहक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी मंगळवारी दुपारी गोपनीय माहितीवरून पांढुर्णा चौकातून जप्त केलेल्या एमएच २७ बीएक्स २१७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १०४ क्विंटल तांदूळ २०८ कट्ट्यांमध्ये होता. पोलिसांनी ट्रकसह वाहक-चालकासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हा ट्रक मोर्शी येथून भंडाऱ्याला जात असल्याची कागदपत्रे आढळली.
२४ तासांनंतरही या धान्यसाठ्याची मालकी कुणी सांगितलेली नाही. त्यामुळे प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत यांच्या नेतृत्वात भंडाऱ्याला रवाना झाले. पोलिसांनी तहसीलदार यांना पत्र देऊन अहवाल मागितला आहे. रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

संशयावरून तांदुळाचा ट्रक थांबवून चौकशी केली असता, त्यामध्ये मोठा साठा आढळून आला. वाहक, चालक आणि एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पथक भंडाऱ्याला रवाना केले आहे.
- मगन मेहते, ठाणेदार वरूड

ठाणेदारांनी पत्र देऊन माहिती मागितली. पुरवठा विभागाने केलेल्या चौकशीत हा साठा भंडाऱ्याला रवाना करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. नमुना प्रयोगशाळेत तपासणीला पाठविला जाणार आहे. पोलीस चौकशीत हा तांदूळ रेशनचा आढळल्यास योग्य कारवाई करू.
- सुनील सावंत, तहसीलदार

Web Title: 104 quintals of rice seized at Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस