जि.प. पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत होणार!

By Admin | Updated: March 16, 2017 03:33 IST2017-03-16T02:38:11+5:302017-03-16T03:33:49+5:30

दानापूर गट, कुटासा गणासाठी पोटनिवडणूक.

Zip Voter lists to be upheld by byelection | जि.प. पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत होणार!

जि.प. पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या अद्ययावत होणार!

अकोला, दि. १५- जिल्हा परिषदेच्या दानापूर गटासाठी आणि अकोट पंचायत समितीच्या कुटासा गणासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या दानापूर गटाच्या सदस्य पदाची आणि अकोट पंचायत समितीच्या कुटासा गणाच्या सदस्य पदाची जागा रिक्त आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या एक आणि अकोट पंचायत समितीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
या पोटनिवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्या अद्ययावत तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात मतदार यादीसंदर्भात १८ मार्चपासून हरकती व सूचना मागविण्यात येणार असून, मतदार यादीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख २३ मार्च आहे. २९ मार्च रोजी मतदार याद्या प्रमाणित करण्यात येणार असून, तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या २९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Web Title: Zip Voter lists to be upheld by byelection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.