'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:10 PM2020-06-13T12:10:26+5:302020-06-13T12:11:05+5:30

संतोषकुमार गवई शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला ...

'Zero Gravity' project a success: Water reaches farmers' dams without electricity | 'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

'झीरो ग्रॅव्हिटी' प्रकल्प यशस्वी : विजेशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाणी

Next

संतोषकुमार गवई

शिर्ला : पातूर तालुक्यातील कोठारी गावातील ५१ शेतकºयांनी मोर्णा धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वावरील प्रकल्प यशस्वी झाला असून, ११ जून रोजी शेतकºयांच्या बांधावर पाणी पोहोचले. परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी २४ तास बारमाही पाणी मिळणार आहे.
कोठारी शेतशिवारात अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा झीरो ग्रॅव्हिटी प्रकल्पाचे प्रमुख हरिदास ताठे तथा महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त हिंमतराव टप्पे या जोडीने एक वर्षापूर्वी ५१ शेतकºयांना एकत्रित करून श्री सोपीनाथ महाराज पाणी वापर संस्थेची स्थापना केली. कोठारी गावाच्या वरील बाजूस मोर्णा धरण आहे असे असूनही या गावाला सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे शेतकºयांना बारमाही शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी हरिदास ताठे यांच्या मार्गदर्शनात आणि हिंमतराव टप्पे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी शेतीला शेतीला कायमस्वरूपी पाणी देता यावे, या उद्देशाने या धरणातून पाइपद्वारे झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा निर्णय १ मे २०१९ रोजी घेतला. त्यानुसार पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सचिन वाकोडे यांच्या माध्यमातून शासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. या प्रकरणीसाठी कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकºयांनी आपली शेती गहान ठेवली. तसेच मोर्णा धरणातून पाइपद्वारे आठ किलोमीटर अंतरावरून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चून झीरो ग्रॅव्हिटी तत्त्वाने पाणी आणण्याचा प्रयोग आज यशस्वी झाला. त्याची यशस्वी चाचणी तज्ज्ञ हरिदास ताठे तथा हिंमतराव टप्पे, अर्जुन टप्पे, हरीश टप्पे यांनी गुरुवारी सकाळी घेतली.


पाण्याची होणार बचत
या प्रकल्पामुळे कॅनलद्वारे खर्चिक, महागड्या, वेळखाऊ आणि पाण्याचा अपव्यय होणाºया पद्धतीला आळा बसणार आहे. या पद्धतीच्या प्रकल्पाची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी कॅनॉलद्वारे दिल्यास पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे सदर प्रकल्प अत्यंत लाभदायी आहे. या प्रकल्पाची माहिती अकोट तालुक्यातील वान प्रकल्पातील येथील शेतकºयांना मिळाली आहे. तेथेही झीरो ग्रॅव्हिटी कोठारी पॅटर्न राबविला जाणार आहे.
 

 

Web Title: 'Zero Gravity' project a success: Water reaches farmers' dams without electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.