विद्रुपा नदीच्या पुरात तरुण वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:00 IST2019-07-29T13:44:38+5:302019-07-29T14:00:29+5:30

तळेगाव बाजार (अकोला): तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीला आलेल्या पुरात भोकर येथील २० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Youth flowed in th river Vidrupa | विद्रुपा नदीच्या पुरात तरुण वाहून गेला

विद्रुपा नदीच्या पुरात तरुण वाहून गेला


तळेगाव बाजार  (अकोला): तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीला आलेल्या पुरात भोकर येथील २० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. नितीन सुनिल दामोधर असे या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथून जवळच असलेल्या भोकर येथील नितीन दामोधर हा तरुण त्याच्या बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरीता सकाळी विदु्रपा नदीकाठावर गेला होता. पावसामुळे नदीला पूर आला असून, काठ निसरडा झाला आहे. काठावरून पाय घसरल्यामुळे नितीन पुरात वाहून गेला. नितीन नदीत पडल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेतली व त्याचा शोध सुरु केला. तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोधमोहिमसाठी सहकार्य केले. ग्रामस्थ नदीपात्रात उतरून नितीनच शोध घेत असून, शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

Web Title: Youth flowed in th river Vidrupa