शेतात शॉक लागून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:35 IST2020-07-31T19:33:15+5:302020-07-31T19:35:30+5:30
विजय भाऊराव गोरवे (वय २३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतात शॉक लागून युवकाचा मृत्यू
पिंजर: येथील युवा शेतकरी रात्री शेतात गेला असता, शेतातील झोपडीत लाइट लावण्याच्या नादात त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ३० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
विजय भाऊराव गोरवे (वय २३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
येथील युवा शेतकरी विजय भाऊराव गोरवे हे रात्रीच्या सुमारास शेतात गेले होते. त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये अंधार असल्याने ते रात्री लाइट लावण्यासाठी मीटर बॉक्सजवळ गेले असता, त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ अजय गोरवे यांनी पिंजर पोलिसात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)