विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:41 IST2020-06-14T10:39:19+5:302020-06-14T10:41:16+5:30

हरीश अब्दुल रज्जाक देशमुख (२३)रा.लोहारा असे मृत युवकाचे नाव आहे.

Youth dies of electric shock | विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

ठळक मुद्दे खांबावर हरीश देशमुख हा विजेचे काम करीत होता.जबर शॉक लागून तो घटनास्थळावरच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क
उरळ/ लोहरा : विद्युत खांबावर विजेचे काम करीत असताना एक ा युवकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही घटना १३ जून रोजी कळंबा शेतशिवारात घडली. हरीश अब्दुल रज्जाक देशमुख (२३)रा.लोहारा असे मृत युवकाचे नाव आहे.
कळंबा शिवारातील खांबावर हरीश अब्दुल रज्जाक देशमुख हा युवक शनिवारी विजेचे काम करीत होता. यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने त्याला विजेचा जबर शॉक लागून तो घटनास्थळावरच ठार झाला.
माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी देवीदास रामचंद्र फाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात हेकॉं वानखडे करीत आहेत.

Web Title: Youth dies of electric shock