रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:28 IST2021-06-22T17:28:08+5:302021-06-22T17:28:19+5:30

Youth dies after falling under train : शिवनी परिसरातील रेल्वे रुळावर एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह शरीरावर जखमा असलेल्या अवस्थेत आढळला.

Youth dies after falling under train | रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

अकोला : खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवनी परिसरातील रेल्वे रुळावर एका २२ वर्षीय युवकाचा मृतदेह शरीरावर जखमा असलेल्या अवस्थेत आढळला. रेल्वेखाली आल्याने या युवकाचा मृत्यू झाला असून मृतकाची ओळख पटत नसल्याने ओळख पाठविण्याचे आवाहन खदान पोलिसांनी केले आहे.

या घटकाच्या अंगावर मेहंदी रंगाची टी-शर्ट तर लाल रंगाचे लोवर घातलेले आहे. उंची ५ फूट ५ इंच असून बांधा मजबूत आहे. या युवकांचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे असून रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. या मृतदेहाची उत्तरीय तपासणी सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आली असून मृतदेह याच ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. खदान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास पीएसआय जमदाडे करीत आहे.

Web Title: Youth dies after falling under train