युवकाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:39 IST2019-06-02T12:38:59+5:302019-06-02T12:39:07+5:30

खंडाळा : उष्माघाताने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे १ जून रोजी दुपारी घडली.

Youth dead heat stroke | युवकाचा उष्माघाताने मृत्यू

युवकाचा उष्माघाताने मृत्यू

खंडाळा : उष्माघाताने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे १ जून रोजी दुपारी घडली. अरुण साहेबराव चिंचोलकर असे मृतक युवकाचे नाव आहे.
खंडाळा येथील अरुण चिंचोलकर हा युवक शनिवारी सकाळी कामावर गेला होता. कामावरून परत आल्यानंतर दुपारी तो राहत्या घरात झोपला. त्यानंतर तो उठलाच नाही. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवर यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामन्य त्रस्त झाले आहे. उष्माघाताने युवकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Youth dead heat stroke