युवक काॅंग्रेसने केली प्रतिकात्मक पेट्राेलपंपांची ताेडफाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:52 IST2021-07-12T16:52:36+5:302021-07-12T16:52:44+5:30

Youth Congress demolishes symbolic petrol pump : आंदाेलनाच्या साखळीत अकाेल्यात साेमवारी प्रतिकात्मक पेट्राेलपंप तयार करून त्याची ताेडफाेड करण्यात आली.

Youth Congress demolishes symbolic petrol pumps | युवक काॅंग्रेसने केली प्रतिकात्मक पेट्राेलपंपांची ताेडफाेड

युवक काॅंग्रेसने केली प्रतिकात्मक पेट्राेलपंपांची ताेडफाेड

अकाेला : इंधन दरवाढीच्या विराेधात युवक काॅंग्रेसने रस्त्यावर उरतून केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध सुरू केला आहे. याच आंदाेलनाच्या साखळीत अकाेल्यात साेमवारी प्रतिकात्मक पेट्राेलपंप तयार करून त्याची ताेडफाेड करण्यात आली. काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक सिव्हिल लाईन चौक येथे हुबेहुब पेट्रोल पंपाची प्रतिकृति तयार करण्यात आली. पेट्रोल-ड़ीझेल आता जन-समान्यांची हातची गोष्ट राहिलेली नाही म्हणुन पेट्रोल पंप मशीनची ताेडफाेड करण्यात आली. या आंदोलनात महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी,साजिद खान पठान,प्रकाश तायड़े,मदन भरगड,राजेश भारती,डॉ.सुभाष कोरपे,प्रशांत वानखड़े,सौ.पुष्पा देशमुख,महेश गणगणे,कपिल रावदेव,अंशुमन देशमुख,पराग कांबळे,आकाश कवडे,मो.इरफान,रवि शिंदें,मोंटी भाई,महेंद्र गवई,दिनेश लोहोकार,गणेश कळसकर,मो.यूसुफ,सुरेश ढाकुलकर,प्रशांत भटकर,राजेश मते,अंकुश तायड़े,राहुल सारवान,अंकुश भेंडेकर,कार्तिक पोदाडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी पंकज देशमुख,दिनेश लोहोकार,अंकुश भेंडेकर,कार्तिक पोदाडे,सुजय ढोरे,भुषण चतरकर,अभय ताले,तुषार गावंडे,सागर ढोरे आदींनी प्रयत्न केले.

 

Web Title: Youth Congress demolishes symbolic petrol pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.