अकाेला : जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील राजू बाबा चाैक परिसरातील शिवसेना वसाहत येथील रहीवासी २९ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना २७ एप्रील राेजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद करीत तपास सुरु केला आहे.शिवसेना वसाहत येथील रहीवासी संदीप तुळशीराम यादगिरे वय २९ वर्ष हे त्यांच्या घरात २७ एप्रील राेजी घरी एकटेच असतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना या प्रकाराची माहीती मीळताच त्यांनी पाेलिसांनाा माहीती दिली. पाेलिसांनी घराचा दरवाजा ताेडून घरात प्रवेश करून संदिप यादगीरे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील डाॅक्टरांनी मृत घाेषीत केले. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला.त्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तसेच पाेलिस तपासात या आत्महत्येचे कारण समाेर येणार असल्याची माहीती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी जुने शहर पाेलिसांनी आकस्मीक मृत्यूची नाेंद केली आहे.
युवकाची राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या
By सचिन राऊत | Updated: April 28, 2024 21:17 IST