भेंडगावचा युवक वाशिम जिल्ह्यातील अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:18 IST2019-02-20T18:18:16+5:302019-02-20T18:18:38+5:30
भेंडगाव : येथील रहिवासी केशव मनवर यांचा धाकटा मुलगा निखिल मनवर (२५) याचा वाशिम जिल्ह्यातील काजळांबा - बोरीजवळ प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात मंगळवारी रात्री मृत्यु झाला.

भेंडगावचा युवक वाशिम जिल्ह्यातील अपघातात ठार
भेंडगाव : येथील रहिवासी केशव मनवर यांचा धाकटा मुलगा निखिल मनवर (२५) याचा वाशिम जिल्ह्यातील काजळांबा - बोरीजवळ प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात मंगळवारी रात्री मृत्यु झाला. गावातील एका प्रामाणिक, कष्टाळू, नेहमी स्मितहास्य, मेहनती, सज्जन युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याने भेंडगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
भेंडगाव येथील निखील केशवराव मनवर आणि त्याचे कुटुंब १९ फेब्रुवारी रोजी रात्री वाशिम जिल्ह्यातील मौजा सापडी येथे एका अंत्यसंस्कार कार्यक्रमावर आॅटोने जात होते. रात्री अंदाजे ८.३० वाजताच्या सुमारास मंगरुळपीर-वाशिम रोडवरील काजळांबा या गावाजवळ आॅटो उलटला. निखीलच्या अंगावर आॅटो पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यावेळी त्याच्यासोबत आई व इतर सदस्य होते. इतरांना किरकोळ मार लागला.