शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी गोवलेला युवक दोषमुक्त!

By admin | Updated: May 10, 2017 07:19 IST

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चेह-याशी साम्य असल्यामुळे निर्दोष युवकाला पोलिसांनी गोवले.

अकोला: टिळक रोडवरील त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्समध्ये दहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चेह-याशी साम्य असल्यामुळे निर्दोष युवकाला पोलिसांनी गोवले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकसुद्धा केली होती. या युवकाला अखेर न्याय मिळाला असून, जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने मंगळवारी त्याला दोषमुक्त करण्याचा आदेश दिला.एका दहा वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून त्रिवेणीश्वर कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावर नेऊन निर्जनस्थळी तिच्यावर दोघा नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. रामदासपेठ पोलिसांनी सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरू केली होती. आरोपीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या प्रवीण चव्हाण (रा. माळीपुरा) याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीसुद्धा सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी वृद्ध भिकारी गोविंद साखरे याला अटक केली होती. त्याच्याकडून मुख्य आरोपींची नावे मिळाली. पोलिसांनी मुख्य आरोपी व प्रवीणच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य असल्याने त्याला अटक करावी लागली. त्याचा घटनेशी संबंध नाही, असे तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले होते. पोलिसांच्या चुकीमुळे निष्पाप प्रवीण चव्हाणला विनाकारण पोलीस कारवाईला सामोरे जाऊन गजाआड व्हावे लागले होते. पोलिसांच्या कृत्याचा मनस्ताप प्रवीण व त्याच्या कुटुंबीयांना सहन करावा लागला. समाजात बदनामी झाली ती वेगळी. त्यामुळे प्रवीण चव्हाण याने न्यायालयात आपल्याला न्याय मिळावा आणि या प्रकरणातून दोषमुक्त करावे, यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याची बाजू ऐकल्यानंतर त्याला या प्रकरणातून दोषमुक्त केले. त्याच्या वतीने अ‍ॅड. केशव एच. गिरी, अ‍ॅड. वैशाली भारती यांनी बाजू मांडली.