खराब रस्त्यामुळे युवा शेतकऱ्याचा मृत्यू; पाणंद रस्त्यावरील मुरुमाच्या ढिगावरून ट्रॅक्टर झाला पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 18:20 IST2023-08-28T18:20:16+5:302023-08-28T18:20:30+5:30
या अपघातात गोपाल राठी यांचा मृत्यू झाला.

खराब रस्त्यामुळे युवा शेतकऱ्याचा मृत्यू; पाणंद रस्त्यावरील मुरुमाच्या ढिगावरून ट्रॅक्टर झाला पलटी
अकाेला : मुरूम रस्त्यावर अंथरून योग्य दबाई न केल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन हिवरखेड येथील युवा शेतकरी गोपाल ऊर्फ दिनेश रमेश राठी (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी घडली.
हिवरखेड येथील युवा शेतकरी गोपाल ऊर्फ दिनेश रमेश राठी (अंदाजे ४०) यांची गोर्धा, तळेगाव परिसरात शेती आहे. सोमवार, २८ ऑगस्ट रोजी पहाटे ते हिवरखेड येथील आपल्या घरून मुंजा वाट या बहुचर्चित पाणंद रस्त्याने शेताकडे छोट्या ट्रॅक्टरने जात असताना रस्त्यावरील मुरुमाच्या ढिगावरून ट्रॅक्टर उलटला. या अपघातात गोपाल राठी यांचा मृत्यू झाला.