शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी वऱ्हाडात रब्बी, उन्हाळी पिकांना सिंचन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:51 IST

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात पूरक जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने पश्चिम विदर्भात (वºहाड) रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणे अशक्य आहे; पण अकोला जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने दोन धरणातील पाणी आतापासूनच सिंचनासाठी सोडण्यात येत आहे.वºहाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत दोन महिन्यांत १४ ते १५ टक्के घट झाली असून, आजमितीस ५१.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात आजमितीस ३७.५८ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठाच नसून, इतर धरणात अल्प जलसाठा शिल्लक असल्याने या धरणामधून सिंचनासाठी पाणी सोडणार नसल्याचे वृत्त आहे.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २३ नोव्हेंबर रोजी ५१.४८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ७७.५७ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ९४.०४, उमा ९२.९८ टक्के तर मोर्णा धरणात ४९.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९१.३८ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ २.६५ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात ११.६६ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये २८.७६ टक्के, मन धरणात २२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८२.६९ टक्के, एकबुर्जी ७३.६० तर सोनल धरणात ९५.९८ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९४.२९, अरुणावती ७०.६७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ४३.६६ टक्के आहे.

 

ज्या धरणात मुबलक जलसाठा आहे, त्या धरणातील पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान धरणात पाणी आहे. त्यामुळे काटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प