शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

World Population Day : लॉकडाऊनमध्ये घसरला अकोला जिल्ह्यातील जन्मदर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:29 AM

जानेवारी २०२० च्या तुलनेत हा आकडा जवळपास ३६ ने कमी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दररोज साधारणत: ८० शिशूंच्या जन्माची नोंद होते. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात जन्मदर घसरल्याचे निदर्शनास येत आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात दररोज साधारणत: ८० शिशूंच्या जन्माची नोंद केली जाते; परंतु लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील जन्माचा दर घसरल्याचे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून निदर्शनास आले आहे. जून महिन्यात दिवसाला सरासरी ५४ नवजात शिशूंच्या जन्माची नोंद झाली असून, जानेवारी २०२० च्या तुलनेत हा आकडा जवळपास ३६ ने कमी आहे.लोकसंख्या वाढ ही जागतिक समस्या असून, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे जगासमोर मोठे आव्हान आहे.इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये ही गंभीर समस्या असून, त्यावर नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम आहे; परंतु यावर्षी कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा यावर विशेष परिणाम झाल्याचे दिसून येते.जिल्ह्यात दररोज साधारणत: ८० शिशूंच्या जन्माची नोंद होते. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय आणि शहरातील खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या शिशूंचा समावेश आहे; परंतु लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात जन्मदर घसरल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्याबाहेरून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाणही घटलेजिल्ह्यात आरोग्य यंत्रणा चांगली असल्याने शेजारील जिल्ह्यातील गर्भवती मोठ्या संख्येने अकोल्यात दाखल होतात; परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात प्रवेश शक्य नसल्याने बाहेरील जिल्ह्यातून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे या काळात जिल्ह्यातील जन्मदर घटला आहे.लोकसंख्या वाढ ही मोठी समस्या असून, त्यावर नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काम सुरू आहे. शिवाय, स्त्री भ्रूणहत्येवर नियंत्रण आणून लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठीही जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबविले जातात. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याच्या बाहेरून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाण घटल्याने ही तफावत दिसून येत आहे.- डॉ. फारूख शेख, आरोग्य अधिकारी, मनपा, आरोग्य विभाग, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय