यंत्रांच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 10:26 IST2019-07-06T10:26:33+5:302019-07-06T10:26:42+5:30

अंबिका कंपनीच्या कामगाराचा पट्ट्यात अडकून मृत्यू झाला आहे.

worker dies in machine band | यंत्रांच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू

यंत्रांच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू

ोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणी रंभापुर येथील अंबिका कंपनीच्या पॅनल यंत्राच्या पट्ट्यात अडकून एका 22 वर्षीय युवक मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शणीवारी सकाळी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार दत्तात्रय श्रीराम चोपडे वय 22 रा.कोळंबी हा रोजंदारीवर अंबिका सोयाबीन कंपनीत रात्रपाळीवर पॅनेल मशीनवर कुटार टाकत असताना अचानक कुटारा सोबत मशीन मध्ये अडकून घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहीती पोलिसांना मिळताच घटनास्थळावर ठाणेदार हरिश गवळी सह पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: worker dies in machine band