शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम जागेअभावी रखडले!

By admin | Updated: May 9, 2017 04:40 IST

जागेचा निर्णय आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समिती घेणार असल्याचे वृत्त आहे.

अकोला: विदर्भातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले आहे. या जागेचा निर्णय आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जमीन संरक्षण समिती घेणार असल्याचे वृत्त आहे.अकोला येथे राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. याकरिता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला पाच कोटी रुपये निधी दिला आहे. महाविद्यालयाला व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार,जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने स्वतंत्र महाविद्यालयासाठी जागा हवी आहे. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. यासाठी सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व वसतिगृहाची गरज भासणार आहे. महाराष्ट्र पशू विज्ञान (माफसू) विद्यापीठ प्रशासनाने जागेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप जागेचा प्रश्न सुटला नसल्याने, विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणे यावर्षी तरी कठीणच आहे. या पृष्ठभूमीवर माफसूने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ४0 हेक्टर जागा मागितली आहे. कृषी विद्यापीठाने यासंदर्भात शिवरनजिकचा हायवे व गुडधी विभागातील जागा दाखविली; परंतु माफसूला वाशिम रोडवरील जागा हवी आहे. याबाबत शनिवारी पार पडलेल्या कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेच्या सभेत चर्चा झाली. सभेला कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, आ. अमित झनक, नितीन हिवसे, गोपी ठाकरे, डॉ. सी.डी. मायी आदींची उपस्थिती होती. परिषदेने कृषी विद्यापीठाच्या जमीन संरक्षण समितीकडे हे प्रकरण सोपवले आहे. ११ मे रोजी या समितीची सभा होईल. कृषी विद्यापीठाच्या इतर सर्वच जागांसह पशू वैद्यकीय पदवी महाविद्यालयाच्या जागेबाबत या सभेत चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या समितीचे अध्यक्ष आ. गोपीकिशन बाजोरिया असून, आ. सावरकर, नितीन हिवसे, गोपी ठाकरे सदस्य आहेत.माफसूची वाशिम रोडला पसंती च्कृषी विद्यापीठाची गुडधी विभागाची जागा सुसज्ज आहे. येथे प्रशस्त रस्ता होत आहे. अभ्यासासाठी शांत वातावरण या भागात आहे. पण, माफसूला वाशिम रोडची जागा हवी आहे.

माफसूकडे ५0 हेक्टर जागा आहे. या जागेच्या मोबदल्यात आम्ही त्यांना वाशिम रोडची जागा देऊ, यासाठीचा करार करावा लागेल.-आमदार गोपीकिशन बाजोरिया,अध्यक्ष, डॉ.पंदेकृवि जमीन संरक्षण समिती, अकोला.