Woment molestation at Vivara | विवरा येथे विवाहितेचा विनयभंग

विवरा येथे विवाहितेचा विनयभंग


खेट्री : येथून जवळच असलेल्या विवरा येथील एका विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २९ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. तसेच एकास क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विवरा येथील विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील दोघांनी तिचा विनयभंग केला. तसेच एकास क्षुल्लक कारणावरून एकास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. दोन्ही घटना २९ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडल्या. या मारहाणीमध्ये एक जण जखमी झाला आहे. प्रथमोपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविले आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी सतीश सिरसाट व अजय सिरसाट यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४ डी, २९४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच सतीश सिरसाट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन तांबरे, वामन तांबरे, संतोष तांबरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४, कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक पंचभाई करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Woment molestation at Vivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.