शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे उमा नदीकाठी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 7:31 PM

Women start hunger strike : रोहणा येथील महिलांनी उमा नदीच्या काठावर बुधवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

मूर्तिजापूर: गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, या मागणीसाठी तालुक्यातील रोहणा येथील महिलांनी उमा नदीच्या काठावर बुधवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

 तालुक्यातील गट ग्रामपंचायत लोनसना अंतर्गत येत असलेल्या ग्राम रोहना येथे पिण्याच्या पाण्याचा व विद्युत पोलवरील लाईटचा प्रश्न अनेक दिवसापासून रेंगाळलेला असल्याचे चित्र दिसत आहे.  सदर प्रश्ना बाबत प्राथमिक जबाबदारी असणाऱ्या व भौतिक सुविधांचा कर वसूल करणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय यांना अनेकदा तोंडी व लेखी तक्रार दिल्या आहेत. परंतु ग्रामपंचायत कडून कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना किंवा दखल घेतली गेली नाही. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकर द्वारे करत असल्याच्या नावाखाली व हातपंपामध्ये मशीन टाकल्याच्या अशी शासनाची दिशाभूल करून आम्हाला आमच जीवनावश्यक हक्कापासून वंचीत ठेवत असल्याचा आरोप सुद्धा महिलांनी केला आहे. गावापासून दूर असलेल्या उमा नदीमधून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. आता सध्या असलेले पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला दूषित पाणी हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू शकते किंवा अचानक आलेल्या पुरात पाणी भरतेवेळी वाहून गेले तर याला जबाबदार कोण ?आणि अंधारात साप, विंचू किंवा काही घटना घडल्या तर याची जबाबदारी कोण घेईल ? अनेक प्रश्न उपोषण करणाऱ्या महिलांना पडले आहे. कारण पाण्याची किंमत आणि त्यासाठी होणारी कसरत महिलांनाच माहीत असते म्हणूनच उपोषणाला बसण्याचा महिला वर्गानी दिनांक १ सप्टेंबर २०२१ रोजी संबधित विभागाला पत्र व्यवहार करून निर्णय घेतला होता. परंतु पोलीस प्रशासनाकडून उपोषण स्थगित करण्यात यावे संबंधित विभागाकडून आपला प्रश्न ६ ते ७ दिवसामध्ये मार्गी लागणार असल्याचे  लिखित पत्रात म्हटले असल्याने परंतु यावर दिलेल्या मुदतमध्ये प्रश्न मार्गी न लागल्याने आज दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी उमा नदीकाठावर भर उन्हात साखळी उपोषणाला ४० ते ४५ महिलांच्या उपस्थिती मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. जो पर्यंत आमचा प्रश्न पूर्णत्वास जाणार नाही तो पर्यंत लढा कायम ठेऊ असा पवित्रा घेतला आहे. सदर उपोषणाला हम चालीस संघटना मूर्तिजापूरच्या वतीने पाठिंबा देऊन सध्याची परिस्थिती लक्षात घेता संघटनेच्या माध्यमातून उपोषण कर्त्या महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव ,तालुका अध्यक्ष रोहित सोळंके ,बंडूभाऊ डाखोरे, बाळू सरोदे शहाबुद्दीन,सुनील वानखडे यासह गावकरी मंडळी उपस्थित होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला