अकोला बसस्थानाकावर महिलेची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:26 IST2018-09-30T12:25:31+5:302018-09-30T12:26:13+5:30

अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सैनिकाने महिलेची छेडखानी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली.

Women molested at Akola Bus Stop | अकोला बसस्थानाकावर महिलेची छेडखानी

अकोला बसस्थानाकावर महिलेची छेडखानी



अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सैनिकाने महिलेची छेडखानी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मध्यवर्ती बसस्थानकावरील पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने धाव घेऊन सदर सैनिकास पोलिस चौकीत आणून प्रकरण आपसात मिटविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या सैनिकाने महिलेची छेडखानी केल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री उशिरा त्याला सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नेण्यात आले, महिलेने पोलिसात तक्रार दिल्यास सैनिका विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दिली.

Web Title: Women molested at Akola Bus Stop