सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 18:13 IST2019-08-02T18:13:37+5:302019-08-02T18:13:42+5:30

हिंगणी बु. : सर्प दंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पाटी येथे २ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली.

Woman killed by snakebite | सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


हिंगणी बु. : सर्प दंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पाटी येथे २ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. सुनदां जयकृष्ण पाटकर असे मृतक महिलेचे नाव आहे.
पाटी येथील सुनंदा पाटकर या शुक्रवारी सकाळी ११ वाजता भांडे घासत होत्या. यावेळी एका भांड्यात दडून बसलेल्या सापाने त्यांना दोन वेळा सर्पदंश केला. कुु टुंबातील सर्व सदस्य शेतात गेल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी बराच विलंब झाला. घटनेची माहिती गावातील काही ग्रामस्थांना मिळताच त्यांनी पाटकर यांच्या घराकडे धाव घेतली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: Woman killed by snakebite