हिटरने पाणी गरम करणे बेतले जीवावर; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:31 IST2019-07-09T18:28:32+5:302019-07-09T18:31:45+5:30
हाता: हिटरने हंड्यामध्ये पाणी गरम करीत असताना, विजेचा जबर धक्का बसल्याने, विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली.

हिटरने पाणी गरम करणे बेतले जीवावर; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू!
हाता: हिटरने हंड्यामध्ये पाणी गरम करीत असताना, विजेचा जबर धक्का बसल्याने, विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
हाता येथील योगेश प्रल्हाद खाडे यांची पत्नी सुषमा ही मंगळवारी सकाळी अंघोळीसाठी हंड्यामध्ये हिटर घालून पाणी गरम करीत होती. दरम्यान हंड्यातील पाणी गरम झाले की नाही, हे पाहण्यासाठी सुषमा थेट हंड्यात घातला आणि तिला जबर विजेचा धक्का बसला. यावेळी घरात कोणी नव्हते. त्यामुळे सुषमाचे प्राण वाचविता आले नाहीत. सुषमा हिला खुशी(९) आणि आनंदी(७) दोन मुली आहेत. खुशी ही इयत्ता तिसरीत तर खुशी पहिलीत शिकते. आईच्या छत्र हरविल्यामुळे दोन्ही मुलींचा मायेचा आधार गेला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (वार्ताहर)